Shiv Sena and Khalistani Supporters: पंजाबमध्ये शिवसेना आणि खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी, प्रचंड दगडफेक, तलवारीही नाचवल्या

Shiv Sena and Khalistani Supporters: एकमेकांना मारहाण करतानाच नंग्या तलवारीही नाचवण्यात आल्या. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला आहे.

Shiv Sena and Khalistani Supporters: पंजाबमध्ये शिवसेना आणि खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी, प्रचंड दगडफेक, तलवारीही नाचवल्या
पंजाबमध्ये शिवसेना आणि खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 2:34 PM

पटियाला: पंजाबच्या पटियालामध्ये शिवसेना (shivsena) कार्यकर्त्यांनी खलिस्तान (khalistan) मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी खलिस्तान समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आले. त्यामुळे दोन्ही गटात जोरदार धुमश्चक्री उडाली. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक करण्यात आली. एकमेकांना मारहाण करतानाच नंग्या तलवारीही नाचवण्यात आल्या. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला आहे. या हाणामारीची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जमावाला आवरताना पोलिसांच्याही (police) नाकीनऊ आले. शेवटी पोलिसांनी अधिक आक्रमकपणे जमावाला पांगवण्यात यश मिळवले. तसेच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, या घटनेमुळे पटियालामध्ये तणावाची स्थिती आहे. दरम्यान, या हाणामारीत अनेकांना मार लागल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही जणांना किरकोळ मार लागल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

शिवसैनिकांनी आज पटियाला येथे खलिस्तान मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यात तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी पोलिसांसमोरच दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. काहींनी तर तलवारी काढून हवेत मिरवल्या. त्यामुळे आणखीनच तणावाचं वातावरण निर्माण झालं.

हे सुद्धा वाचा

शिवसैनिक खलिस्तान होऊ देणार नाही

शिवसेनेचे पंजाबचे कार्यकारी अध्यक्ष हरिश सिंगला यांच्या नेतृत्वात आर्य समाज चौकात खलिस्तान मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पुढे जात होते. शिवसैनिक कधीही पंजाबमध्ये खलिस्तान होऊ देणार नाही. तसेच खलिस्तानचं कुठेही नाव देऊ देणार नाही, असं सिंगला यांनी सांगितलं. याच वेळी शीख संघटनेचे काही कार्यकर्ते तलवारी नाचवत आले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बऱ्याच प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.