Video: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, SDRF च्या तीन टीम तैनात, व्हिडीओ व्हायरल
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याचं समोर आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी ढगफुटीच्या घटनेत कोणतीही जीवितहाी झाली नसल्याची माहिती दिली आहे.
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याचं समोर आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी ढगफुटीच्या घटनेत कोणतीही जीवितहाी झाली नसल्याची माहिती दिली आहे. ही घटना घडली त्यावेळी अमरनाथमधील गुहेत एकही व्यक्ती उपस्थित नव्हता त्यामुळे जीवितहानी टळली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) दोन पथके या गुहेजवळ खबरदारीचा उपाय म्हणून तैनात करण्यात आली होती. गांदरबल येथेही एसडीआरएफचं एक अतिरिक्त पथक तैनात करण्यात आलं आहे. अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमध्ये 3,880 मीटर उंचीवर आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी गुंड आणि कंगन भागातील लोकांना सिंधू नदीपासून दूर राहाण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.
अमित शाह यांचं ट्विट
बाबा अमरनाथ की पवित्र गुफा के पास बादल फटने के संबंध में मैंने जम्मू-कश्मीर के LG श्री मनोज सिन्हा जी से बात कर जानकारी ली है। राहत कार्यों व स्थिति के सटीक आकलन के लिए NDRF की टीमें वहाँ भेजी जा रही हैं।
— Amit Shah (@AmitShah) July 28, 2021
ढगफुटीच्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. “बाबा अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटीविषयी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा जी यांच्याशी बोललो, असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं आहे. मदत कार्यासाठी आणि परिस्थितीवर निंयत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफचे पथक तेथे पाठवत असल्याचं अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बुधवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम गावात ढगफुटीच्या घटनेत 7 जण ठार तर 17 जण जखमी झाले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास दाचन तहसील क्षेत्रातील होनजार गावात ढगफुटीमुळे पूल, नदीकाठावरील सहा घरे आणि रेशन दुकान नुकसानग्रस्त झाले होते. पोलीस, सैन्य व एसडीआरएफ यांच्याकडून संयुक्तरित्या बचावकार्य सुरु आहे. याघटनेत 14 लोक बेपत्ता असून त्यांच्या शोध घेण्याचं काम सुरु आहे.
Cloudburst near holy #Amarnath cave. No loss of life or injury reported in the incident. No yatris were present at the cave. 2 SDRF teams are already at the spot. pic.twitter.com/sc09A1syun
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) July 28, 2021
केंद्र सरकार लक्ष ठेवून : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे, असं म्हटलं. नुकसानग्रस्त भागात सर्वतोपरी मदत पोहोचवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांच्याशीही बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली असल्याचं सांगितलं आहे.
किश्तवाड जिल्हा विकास आयुक्त अशोक कुमार शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, ढगफुटीच्या घटनेतील सात लोकांचे मृतदेह बचाव कार्य करणाऱ्या जवानांना सापडले आहेत. जखमी झालेल्या 17 जणांना वाचविण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. बेपत्ता झालेल्या 14 जणांचा शोध अद्याप सुरू आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या:
शेतातला बनावट दारुचा कारखाना उधळला, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, धुळे पोलिसांची दणकेबाज कामगिरी
उत्तर प्रदेशात भीषण अपघात, बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला, देशाला हादरवणारी घटना
Cloud burst near Amarnath Cave in jammu kashmir pahalgam two sdrf teams deployed