Arvind Kejriwal Arrest : केजरीवालांच्या तीन पिढ्या इंजिनिअर, वडील तुरुंगात असताना मुलगी सर्वात अवघड परीक्षेत पास

उच्च शिक्षणात केजरीवालांची मुलही मागे नाहीत, 'या' प्रतिष्ठीत संस्थेतून घेतलीय पदवी. अरविंद केजरीवाल यांच्या उच्च शिक्षणाचा वारसा त्यांची मुल पुढे चालवतायत. अरविंद केजरीवाल यांच शिक्षण खरोखरच कौतुकास्पद आहे. अरविंद केजरीवालांनी टाटा स्टीलमध्ये सुद्धा नोकरी केलीय.

Arvind Kejriwal Arrest : केजरीवालांच्या तीन पिढ्या इंजिनिअर, वडील तुरुंगात असताना मुलगी सर्वात अवघड परीक्षेत पास
Arvind Kejriwal Family
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 10:49 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने दारु घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. सरकारी अधिकारी ते राजकीय नेता असा केजरीवाल यांचा प्रवास राहिला आहे. केजरीवाल दांम्पत्य फक्त क्लास वन अधिकारी नाहीय, तर त्यांची मुल सुद्धा तितकीच उच्चशिक्षित आहेत. दिल्लीचे सर्वात युवा मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांनी सुरुवात केली. 28 डिसेंबर 2013 रोजी केजरीवाल यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी ते केंद्रशासित प्रदेशाचे युवा मुख्यमंत्री बनले. 49 दिवस सत्तेवर राहिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 14 फेब्रवारी 2015 रोजी ते दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. तिसऱ्यांदा 16 फेब्रुवारी 2020 रोजी ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. केजरीवाल यांच्या दोन्ही मुलांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत देशातील प्रतिष्ठीत संस्था आयआयटीमधून शिक्षण घेतलय.

केजरीवाल यांच्या 3 पिढ्या इंजिनिअर आहेत. अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम केजरीवाल इंजिनिअर होते. त्यांनी बिरला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची पदवी घेतली. राजकारणात येण्याआधी अरविंद केजरीवाल सरकारी नोकरी करायचे. राजकारणात प्रवेशाआधी त्यांनी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS), सामाजिक कार्य, सामाजिक कल्याण योजना, आयकर आणि वीजेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी परिवर्तन नावाची एनजीओ बनवली. वर्ष 2006 मध्ये केजरीवालांनी सरकारी नोकरीचा (आयकर विभाग) राजीनामा दिला. त्यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. केजरीवाल हे माहिती अधिकार (RTI) आणि जन लोकपाल आंदोलनासाठी ओळखले जातात.

देशभरातून केजरीवालांचा कितवा रँक आला?

हरियाणाच्या हिसार आणि सोनीपतमधून शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर केजरीवाल यांनी 1985 मध्ये आयआयटी जेईईची परीक्षा दिली. देशभरातून त्यांना 563वीं रँकिंग मिळाली. त्यांनी आयआयटी खडगपूर येथून मॅकेनिकल इंजीनियरिंगच शिक्षण घेतलं. 1989 मध्ये बीटेकची डिग्री घेतली. 1989 मध्ये जमशेदपूर टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी सिविल सर्विसेजच्या परीक्षेसाठी नोकरीमधून सुट्टी घेतली.

केजरीवालांना काय बनायच होतं?

वर्ष 1993 मध्ये त्यांची भारतीय राजस्व सेवेसाठी (IRS) निवड झाली. आपल्या पहिल्याच प्रयत्नात भारतीय राजस्व सेवेसाठी निवड झाल्यानंतर केजरीवाल यांनी भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये (IAS) जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा परीक्षा दिल्यानंतर ते पुन्हा भारतीय राजस्व सेवेसाठी निवडले गेले. हेच पद त्यांनी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. 1995 मध्ये आयकर विभागात असिस्टेंट कमिश्नर बनवण्यात आलं. त्यांचा मुलगा पुल्कित केजरीवालने 2019 सीबीएसई 12वीं बोर्ड परीक्षेत 96.4 टक्के गुण मिळवले. मुलाने सुद्धा आयआयटी दिल्लीत प्रवेश घेतला. दोन्ही मुल आयआयटी ग्रॅज्युएट आहेत. पत्नी सुनीताने IRS मधून VRS घेतली आहे.

वडील तुरुंगात असताना मुलगी परीक्षेत पास

मुलगी हर्षिताने वर्ष 2014 मध्ये जेईई एडवांस्ड एग्जाममध्ये 3,322 वी रँकिंग मिळवली. तिने आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. वडील तिहाड तुरुंगात बंद असताना हार्षित ही परीक्षा पास झाली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.