Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगी सरकारचं 58 हजार महिलांना गिफ्ट, दर महिन्याला रोजगारासह 5200 रुपये कमवण्याची संधी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शेकडो महिलांना खुशखबर दिली आहे. (CM Yogi Adityanath gift to women)

योगी सरकारचं 58 हजार महिलांना गिफ्ट, दर महिन्याला रोजगारासह 5200 रुपये कमवण्याची संधी
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 5:36 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी राज्यातील शेकडो महिलांना खुशखबर दिली आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ग्रामीण क्षेत्रात बँकींग सुविधेसाठी आणि महिलांना स्वालंबासाठी नवी दिशा दाखवण्यासाठी बीसी सखीची (Business Correspondent Sakhi)  योजना आणली आहे. बीसी सखीचं प्रशिक्षण 15 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्याला एकूण 58 हजार बीसी सखी मिळतील. या बीसी सखींना सहा महिन्यांपर्यंत 5 हजार 200 रुपये स्टायपेंड दिलं जाणार आहे (CM Yogi Adityanath gift to women).

“बीसी सखी (BC Sakhi) यांचं प्रशिक्षण, कार्यप्रणाली, ड्रेस इत्यादी गोष्टींसाठी संपूर्ण तयार झाली आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या प्रयत्नात बीसी सखी महत्त्वाची भूमिका बजावतील, बँकिंग सेवांच्या विस्तार आणि सुविधेच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचं पाऊल ठरेल”, अशी प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी दिली.

दरम्यान, बीसी सखींच्या पेहराबाबातही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. भारतीय परंपरेनुसार बीसी सखी यांचा पेहराव ठरवण्याच्या सूचना योगींनी दिल्या आहेत (CM Yogi Adityanath gift to women).

बीसी सखींची निवड कशी केली?

ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोजकुमार सिंह यांनी बीसी सखींच्या निवड प्रक्रियेबाबत माहिती दिली. “मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत बीसी सखी नेमण्यासाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यात आले होते. राज्यभरातून एकूण 2 लाख 16 हजार अर्ज आले. तर ग्रामपंचायतींचे एकूण 58 हजार 532 अर्ज आले. त्यानंतर योग्य निवड प्रक्रियेच्या आधारे पहिल्या टप्प्यात 56 हजार 875 अर्जदारांची निवड करण्यात आली. त्यांना 15 डिसेंबरपासून प्रशिक्षण दिले जाईल. राज्य संचालक आरसेटीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात दर आठवड्याला 30-30 च्या दोन बॅचेसला प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर आयआयबीएफतर्फे ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल”, असं मनोजकुमार यांनी सांगितलं.

बीसी सखींना ‘या’ बँकांसोबत जोडलं जाईल

बीसी सखींना मदतीसाठी कमर्शिअल बँक, कॉर्पोरेट बीसी, फिनटेक पेमेंट बँक यांच्याशी जोडलं जाईल. यासंबंधित प्रक्रिया सध्या सुरु आहे. यासाठी जवळपास 34 कंपन्यां इच्छुक आहेत. याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. असं मनोजकुमार सिंह यांनी सांगितलं.

विना व्याजाचं कर्ज दिलं जाईल

बीसी सखीला डेस्कटॉप कम्प्यूटर, लॅपटॉप, पीओएस मशीन (PoS Machine), कार्डरीडर (Card Reader), फिंगरप्रिंट रीडर (Finger Print Reader), अँटीग्रेटेड इक्यूपमेंट लागतील. या वस्तूंच्या खरेदीसाठी त्यांना विना व्याजाचं कर्ज दिलं जाईल.

दर महिन्याला वेतन मिळणार

बीसी सखीला दर महिन्याला 4000 रुपये आणि 1200 रुपये समूह सखीच्या रुपात काम केल्याबद्दल दिले जातील. याशिवाय ते 25 हजार रुपयांपर्यंत ओव्हर ड्राफ्ट करु शकतील. त्याचबरोबर त्यांना प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 2 टक्के कमिशन मिळेल.

हेही वाचा : MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम 

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.