आधी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने अन् मग आईने थेट पोलीस अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलनाला जाण्यापासून रोखल्याने मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा. जीने एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पोलीस कर्मचार्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे शर्मिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
एस. ज्युबली हिल्स पोलीस स्टेशनजवळ विजयम्मा एका महिला कॉन्स्टेबलला कानशिलात लगावलताना दिसत आहे. त्या अटक केलेल्या शर्मिला यांना भेटायला आल्या होत्या. पोलिसांनी सांगितले की, शर्मिला आणि त्यांच्या ड्रायव्हर विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३५३ (लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळ), ३३२ (लोकसेवकाला कर्तव्यापासून स्वेच्छेने परावृत्त करणे) कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#WATCH | YSRTP Chief YS Sharmila manhandles police personnel as she is being detained to prevent her from visiting SIT office over the TSPSC question paper leak case, in Hyderabad pic.twitter.com/StkI7AXkUJ
— ANI (@ANI) April 24, 2023
पोलिसांनी सांगितले की त्यांनी काही टीव्ही फुटेज पाहिले आहेत, ज्यामध्ये शर्मिला पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहे जे त्यांना परवानगीशिवाय आंदोलन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलीस उपायुक्त डी. जोएल डेव्हिस यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्हाला जेव्हा एसआयटी कार्यालयाकडे त्यांच्या मोर्चाची माहिती मिळाली तेव्हा अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले कारण त्यांनी आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेतली नव्हती. अधिकारी तेथे परवानगी नसल्याची माहिती देण्यासाठी आणि तेथे जाण्यापासून रोखण्यासाठी गेले होते. समोर आलेल्या फोटोंमध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. अधिकाऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.
शर्मिला म्हणाल्या की तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या (टीएसपीएससी) प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी त्यांना एसआयटी कार्यालयात जायचे होते, त्यानंतर पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले.
#WATCH | YSRTP Chief YS Sharmila’s mother YS Vijayamma shoves police personnel as she visits her daughter at Jubilee Hills Police Station after her detention#Hyderabad pic.twitter.com/jdchj1LnTU
— ANI (@ANI) April 24, 2023
टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये चिडलेल्या शर्मिला एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करताना आणि एका महिला पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण करत असल्याचे दाखवून पोलिसांना विचारले की तुम्ही तिला का थांबवत आहात. त्यांनी वाहनात बसून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवून पुढे जाण्यापासून रोखले, त्यानंतर त्यांनी पोलिसांशी वाद घातला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला माहिती मिळाली की त्या एसआयटी कार्यालयात आंदोलन करण्याचा विचार करत आहे. यासाठी कोणतीही परवानगी नव्हती. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि दोघांना धक्काबुक्कीही केली.
आपल्या कृत्याचा बचाव करताना शर्मिला यांनी येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्वसंरक्षणार्थ वागणे ही माझी जबाबदारी आहे.” शर्मिला यांनी महिला कॉन्स्टेबलला थप्पड मारल्याच्या माहितीबद्दल विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले की ते या घटनेची पडताळणी करत आहेत आणि YSR तेलंगणा पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला यांनी यापूर्वी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशीची मागणी केली होती.
शर्मिला यांची आई विजयम्मा यांनी ज्युबली हिल्स पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर एका महिला कॉन्स्टेबललाही थप्पड मारल्याच्या वृत्तांबद्दल विचारले असता, पोलिसांनी सांगितले की, “पोलीस स्टेशनजवळ पोलिसांशी झालेल्या भांडणात विजयम्मा एका महिला कॉन्स्टेबलला थप्पड मारताना दिसत आहे.” सविस्तर माहिती मिळाल्यानंतर आणि पडताळणीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.