तर मग महाराष्ट्र आणखी काकडणार? IMD कडून इशारा

किमान तापमान चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे.

तर मग महाराष्ट्र आणखी काकडणार? IMD कडून इशारा
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 2:58 PM

नवी दिल्ली : बुधवारी सकाळी कडाक्याच्या थंडीमुळे संपूर्ण दिल्ली (Delhi) धुक्याने (Fog) झाकलं गेलं होतं. यावेळी किमान तापमान चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे सफदरजंगमध्ये 201 मीटर तर पालममध्ये 350 मीटर इतकी दृश्यमानता (Visibility) होती. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, शून्य ते 50 मीटर दरम्यान दृश्यमानता असते तेव्हा धुकं ‘खूप दाट’ असतं. 50 आणि 200 मीटर दरम्यान दाट तर 201 आणि 500 ​​मीटर दरम्यान ‘मध्यम’ आणि 501 आणि 1000 च्या दरम्यान हलकी दृश्यमानता मानली जाते. (cold wave and fog expected in delhi ncr maharashtra for next 3 days)

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, सफदरजंग वेधशाळेमध्ये किमान तापमान सामन्य तापमानापेक्षाही कमी म्हणजेच 4 डिग्री अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. तर लोधी रोड हवामान केंद्रानुसार, किमान तापमान 3.7 डिग्री अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. इतकंच नाही तर हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हवामानात आणखी बदल होऊन पुढच्या तीन दिवसांमध्ये देशातील महत्त्वाची शहरं आणखी गारठणरा असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

पुढच्या तीन दिवसांपर्यंत थंडी आणखी वाढणार

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. दिल्लीमध्येही पुढचे तीन दिवस शीतलहरींचा परिणाम पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी तापमान तीन डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल आहे. दरम्यान, याचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळेल. राज्यातही डोंगराळ भागात आणि घाटमाथ्यावर धुक्यांसह कडाक्याची थंडी पाहायला मिळणार आहे.

मुंबईत माथेरानचा फिल, पारा घसरला, महाबळेश्वरमध्ये हिमकण

विदर्भ, मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढला आहे. कालपासून मुंबईचं वातावरणात गारठा वाढू लागला आहे. आज मुंबईतील पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. मुंबईचं तापमान हे माथेरानच्या तापमानाइतकं घसरलं आहे. तर महाराष्ट्राचं मिनी काश्मिर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा 6 अंशावर आला आहे.

मुंबईचा पारा माथेरानइतका

मुंबईत हवामानात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील शीतलहरीमुळे मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे 16 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे मुंबईतील या सत्रातील सर्वात नीचांकी तापमान आहे. सलग दोन दिवसांपासून मुबंईत तापमान कमी असल्याने मुंबईकरांना माथेरानचा फिल येतो आहे.

महाबळेश्वरात पारा 6 अंशावर

महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 6 अंशावर येऊन पोहचला आहे. महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरा कमी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी हिमकण पाहायला मिळत आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक येऊ लागले आहेत. त्यातच आज काही ठिकाणी हिमकण पाहायला मिळाले. मागील दोन वर्षापूर्वीही आजच्या दिवशी हिमकण पाहायला मिळाले होते. (cold wave and fog expected in delhi ncr maharashtra for next 3 days)

संबंधित बातम्या :

Weather Alert : राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

(cold wave and fog expected in delhi ncr maharashtra for next 3 days)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.