Sanjay Raut : राज्यात कॉमेडी एक्सप्रेस सुरू ते खासदारांवर कारवाईचा इशारा; राऊतांच्या पत्रकार परिषदेतील पाच मोठे मुद्दे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी हे फुटीर नेते कशी काय बरखास्त करु शकतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली – शिवसनेच्या (Shiv Sena MP) 12 खासदारांनी केलेलं बंड, एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची झालेली ऑनलाईन मिटिंग हा सगळा कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 होता, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केली आहे. विधानसभेत याचा पहिला सिझन झाल्याचे सांगत, आता 20 तारखेला सुप्रीम कोर्टात याचा न्याय होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी हे फुटीर नेते कशी काय बरखास्त करु शकतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या शिवसेनेत असलेल्या खासदारांची परेडही त्यांनी निमित्ताने केली. राऊतांच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे लोकसभेतील पाच खासदार उपस्थित होते. त्यात अरविंद सावंत, परभणीचे बंडू जाधव, ठाण्याचे राजन विचारे, रत्नागिरीचे विनायक राऊत, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. तर गजानन किर्तिकर हे आजारी असल्याचे सांगण्यात आले आहे. कलाबेन डेलकर बाहेर आहेत. अजून काही बाहेर आहेत. असेही सांगण्यात आले. अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी हेही राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. त्यांच्या पत्रकार परिषदेतील पाच महत्त्वाचे मुद्दे
1. हा तर कॉमेडी एक्सप्रेसचा सीझन 2
हा प्रकार कॉमेडी एक्सप्रेस 2 आहे. कॉमेडी एक्सप्रेस सीजन 1 विधीमंडळात झाला. 20 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. खंडपीठात फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय लागेल. आम्हाला खात्री आहे. जी याचिका शिवसेनेची आहे. ती कायद्याच्या आधारे पक्की आहे. आम्हाला न्याय मिळेल म्हणून त्या भीतीतून एक गट शिवसेनेची कार्यकारिणी कसा काय बरखास्त करू शकतो. त्या गटाला मान्यता नाही.
2. हे बाळासाहेबांची राष्ट्रीय कार्यकारिणी कशी बरखास्त करु शकतात
शिवसेना पक्षही त्यांचा नाही हे लोक बाळासाहेबांचा पक्षाची कार्यकारीणीच बरखास्त करत आहे. कातडी वाचवण्यासाठी फुटून गेलेले आमदार वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. शिवसेनेचे नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने तयार केले आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. हा गट नाही. ही ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. कायद्यानेही नाही. लोकांना भ्रमित करण्याचाहा प्रकार आहे. त्याचा सेनेवर परिणाम होणार नाही
3. कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल
लोकसभेत कुणी प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यांच्या दाव्याला उत्तर द्याला बसलो नाही. आम्ही शिवसेनेची भूमिका मांडत असतो. आम्ही मुख्यप्रतोदपदी राजन विचारे यांची नेमणूक कायद्याच्या आधारे केली आहे. तेच राहतील. शिवसेनेचे खासदार फुटीर गटाबरोबर बैठका घेत असेल तर कारवाई केली जाईल. त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणताही आधार नाही. एक फुटीर गट मूळ पक्षाची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो. त्यांना अधिकारच नाही.
4. मुख्यमंत्र्यांच्या जोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार
स्वत मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अपात्रतेसाठी जी १६ नाव दिलं त्यात मुख्यमंत्र्यांचं नाव पहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्री येतील. त्याची खुर्ची वाचवण्यासाठी येतील. पण या देशातील न्याय मेला नाही याची मला खात्री आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय होईल. किर्तीकर आजारी आहेत. तुम्ही आकडे मोजात. ते जे आकडे देत आहेत. ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी देत आहे. ही फसवाफसवी सुरू आहेत. लोक मजा घेत आहे. फुटून गेलेले लोक आहेत बाहेर. तुम्ही म्हणता आमची शिवसेना. कोणत्या आधारे म्हणता. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती शिवसेना भवनातून सुरू राहील. तुम्ही तुमचा खुशाल वेगळा संसार मांडा.
5. उद्धव ठाकरे वादळ निर्माण करतील
मुख्यमंत्र्यांना दिल्लीत का यावं लागतं. आमचं हायकमांड दिल्लीत नाही. मुंबईत आहे. भाजपसोबत सत्ता होती तेव्हाही आमचं हायकमांड मुंबईतच होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री कधीच दिल्लीत आला नाही. लोक नोकऱ्या बदलतात, मालक बदलतात. तसं यांनी मालक बदलला आहे. शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर आहे. आम्ही हळूहळू घेत आहोत. अजूनही आम्ही फार सौम्यपणे घेत आहोत. कायदेशीर लढाईतच आमचा वेळ जातोय. उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडतील. महाराष्ट्राबाहेरील राज्यांचा दौरा करतील. त्यानंतर एक तुफान निर्माण होईल, त्या तुफानापुढे कोणीही टिकणार नाहीतत