मार्च महिना आला, आधार, पॅनकार्डसह ही पाच काम कराच, अन्यथा

करबचतीसाठी गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे. या कालावधीत ही कामे केले नाही तर दंड लागणार आहे. यामुळे ३१ मार्च पूर्वी महत्वाची कामे पूर्ण करा.

मार्च महिना आला, आधार, पॅनकार्डसह ही पाच काम कराच, अन्यथा
३१ मार्च
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 11:10 AM

नवी दिल्ली : मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेर. बँकांपासून अनेक संस्थांमध्ये मार्च क्लोजिंगची काम सुरु असताना सामान्यांसाठी महत्वाचा महिना आहे. कारण सरकारने अनेक गोष्टी अद्यावत करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. तसेच करबचतीसाठी गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे.  या कालावधीत ही कामे केले नाही तर दंड लागणार आहे. या महिन्यात तुम्हाला ही महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. यापैकी एक काम म्हणजे पॅनला आधारशी लिंक करणे. तुम्ही हे 31 मार्च 2023 पर्यंत न केल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल. तुम्ही 1000 रुपये विलंब शुल्कासह 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी पॅन लिंक करू शकता.

पॅन अन् आधार कार्ड

हे सुद्धा वाचा

तुम्ही अजून तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. तुम्ही हे 31 मार्च 2023 पर्यंत न केल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) 30 जून 2022 नंतर आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपये विलंब शुल्क आकारत आहे.

गुंतवणूक करण्याची संधी

2022-23 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही अद्याप कर गुंतवणूक केली नसेल, तर ती लवकरच करा. तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना, 5 वर्षांची FD आणि ELSS इत्यादींमध्ये गुंतवणूक करून कलम 80C कर सूट मिळवू शकता. यासाठी ३१ मार्चपर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी लागेल.

पीएम वय वंदना

जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंतच करू शकतात. ही योजना पुन्हा सुरु राहणार की नाही, यासंदर्भात सरकारने कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. यामुळे तुम्ही 31 मार्चपर्यंतच यात गुंतवणूक करू शकता. त्यानंतर ही योजना बंद होणार आहे.  ही 60 वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.

अमृत कलश या महिन्यात संपणार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची नवीन मुदत ठेव योजना अमृत कलश या महिन्यात संपणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर इतरांना 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल.

म्युच्युअल फंडात नॉमिनेशन

जर तुम्ही म्युच्युअल फंडात नॉमिनेशनची प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा. यासाठी सर्व फंड हाऊसेसने 31 मार्चची मुदत दिली आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.