गांधी घराण्याचा आणखी एक चेहरा थेट जनतेसमोर निवडणुकीला सामोरं जाणार, काँग्रेसकडून मोठी घोषणा

गांधी घराण्याचा आणखी एक मोठा चेहरा आता थेट जनतेसमोर निवडणुकीला सामोरं जाणार आहे. काँग्रेसकडून वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी वाड्रा यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

गांधी घराण्याचा आणखी एक चेहरा थेट जनतेसमोर निवडणुकीला सामोरं जाणार, काँग्रेसकडून मोठी घोषणा
गांधी घराण्याचा आणखी एक चेहरा थेट जनतेसमोर निवडणुकीला सामोरं जाणार
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 10:01 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या. तसेच काही राज्यांमधील पोटनिवडणुकादेखील जाहीर करण्यात आल्या आहेत. केरळमधील वायनाड लोकसभेची पोटनिवडणूक देखील निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघात 13 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा रायबरेली लोकसभा मतदारसंघातूनही विजय झाल्याने त्यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. या जागेवर आपण पोटनिवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी 17 जूनला केली होती. यानंतर आज निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून अधिकृतपणे प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, प्रियंका यांच्यासह केरळच्या पलक्कड विधानसभा जागेसाठी राहुल ममकूटाथिल आणि चेलक्करा जागेसाठी राम्या हरिदास यांची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

प्रियंका गांधी 1999 मध्ये सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं होतं. त्यांनी सुरुवातीला आपल्या आई सोनिया गांधी यांच्यासाठी अमेठी लोकसभा मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली होती. पण प्रियंका गांधी यांनी स्वत: कधी निवडणूक लढवली नव्हती. यावेळी प्रियंका गांधी वायनाडच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरत आहेत. याबाबत 17 जूनला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

प्रियंका गांधी यांचा 2019 पासूनचा राजकीय प्रवास

प्रियंका गांधी यांनी जानेवारी 2019 मध्ये अधिकृतपणे राजकारणात एन्ट्री मारली होती. त्यांना पक्षाकडून उत्तर प्रदेश काँग्रेसच्या महासचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यावेळी प्रियंका गांधी यांच्यात त्यांची आजी इंदिरा गांधी यांची छवी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. महासचिव पदाची धुरा सांभाळत असताना प्रियंका यांनी त्यांची आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात केला.

प्रियंका गांधी यांनी लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी मोठं काम केलं होतं. त्यांच्या प्रयत्नांमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेस पुनर्जीवित झाली होती. त्यावेळी काँग्रेसला एकूण 52 जागांवर विजय मिळाला होता. त्यामध्ये प्रियंका गांधी यांचं देखील महत्त्वाचं योगदान होतं. प्रियंका गांधी यांनी 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचं काम केलं. त्यांनी महिला सशक्तीकरणाचा मुद्दा लावून धरला होता. पण त्यावेळी प्रचंड प्रयत्न केल्यानंतरही काँग्रेसच्या पदरात केवळ 2 जागा आल्या होत्या. असं असलं तरी त्याचवेळी हिमाचल प्रदेशाच्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 68 पैकी 40 जागांवर यश आलं होतं. विशेष म्हणजे प्रियंका गांधी यांनी ज्या 5 जिल्ह्यांमध्ये प्रचार केला होता त्या भागात तब्बल 23 जागा या काँग्रेसने जिंकल्या होत्या.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?.
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.