संसदेतील धक्काबुक्की प्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडे, राहुल गांधी विरोधातील एफआयआरसुद्धा…
संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आले. गुन्हे शाखेकडून भाजप आणि काँग्रेसने दिलेल्या तक्रारीचा तपास करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधातील एफआयआरचा तपासही गुन्हे शाखा करणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वादळ निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस खासदारांमध्ये संसदेच्या आवारात धक्काबुक्की झाली होती. त्यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले. या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप करण्यात आला. भाजपकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे काँग्रेसनेही भाजप सदस्याविरोधात तक्रार केली आहे. आता दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गुन्हा शाखेकडे दिले आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आले. गुन्हे शाखेकडून भाजप आणि काँग्रेसने दिलेल्या तक्रारीचा तपास करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधातील एफआयआरचा तपासही गुन्हे शाखा करणार आहे.
काय घडला होता प्रकार?
गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात गुरुवारी काँग्रेस पक्षाने संसदेत निदर्शने केली होती. त्यावेळी भाजपकडूनही काँग्रेसविरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी सकाळी 10.40 वाजता काँग्रेसने संसदेच्या आवारात निदर्शने केली होती. त्यावेळी भाजपचे खासदार त्या ठिकाणी होते.
दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात धक्काबुकी झाली. भाजप आणि काँग्रेसचे खासदार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. ही घटना सुमारे 20 मिनिटे चालली. भाजप खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपकडूनही तसाच आरोप करण्यात आला. भाजपने आरोप केली की, राहुल गांधी यांनी खासदारांना धक्काबुक्की केली. त्यात भाजपचे खासदार प्रताप सारंगी, खासदार मुकेश राजपूत जखमी झाले. प्रताप सारंगी म्हणाले, मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो खासदार माझ्या अंगावर पडला. त्यामुळे मी पडलो आणि जखमी झालो.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावले. वेणुगोपाल म्हणाले की, प्रत्यक्षात भाजप खासदारांनी राहुल गांधी यांना घेरले. त्यांचा मार्ग अडवला. यासंदर्भात आम्ही सभापतींकडे तक्रार केली आहे.