“फोटोसाठीच अट्टाहास माझा”, लसीकरण करताना मास्क काढल्याने काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल
मोदींनी कोरोना लसीकरणादरम्यान फोटो काढण्यासाठी मास्क काढल्याने काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला चढवलाय.
मुंबई : देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आज (1 मार्च) सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतली. तसेच आपला फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली. मात्र, मोदींनी कोरोना लसीकरणादरम्यान फोटो काढण्यासाठी मास्क काढल्याने काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला चढवलाय. याशिवाय सोशल मीडियातूनही त्यांच्यावर टीका होतेय. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी मोदींचा फोटोसाठीच अट्टाहास असल्याची टीका केलीय (Congress criticize PM Narendra Modi for removing Mask while Corona Vaccination).
राजू वाघमारे यांनी मोदींचा लसीकरण घेतानाचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे, “कोरोनाची लस घेण्यासाठी कोरोनाचा “मास्क” नाही? रवींद्रनाथ टागोर छबीसाठी “मास्क” घातला नाही? फोटोसाठीच अट्टाहास माझा!”
कोरोनाची लस घेण्यासाठी कोरोनाचा “मास्क” नाही ? रवींद्रनाथ टागोर छबीसाठी “मास्क” घातला नाही ? फोटोसाठीच अट्टाहास माझा ! @PMOIndia @BJP4India @INCIndia @NANA_PATOLE @INCMaharashtra @INCMumbai @CMOMaharashtra pic.twitter.com/hy5YaJAROZ
— Dr. Raju waghmare (@drrajuwaghmare) March 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विट खाली काही युजर्स जसा मास्कबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. काहींनी तर अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडन यांचा कोरोना लस घेतानाचा फोटो ट्विट करत त्यांची आणि मोदींची तुलना केलीय. तर काहींनी मोदींनी फोटो घेण्यासाठी मास्क काढल्याने त्यांना फोटोजीवी म्हणून टोलाही लगावला. तसेच काही जण त्यांना रोजगाराविषयी देखील प्रश्न विचारत आहेत.
Genuine leaders follow protocols and shut their campaigning mode while getting vaccinated.
*Noticed Assam gamosa? pic.twitter.com/MxE6XG9Yr9
— Anu Mittal (@stylistanu) March 1, 2021
दुसरीकडे मोदींच्या समर्थकांकडून त्यांचं कौतुकही होत आहे. मोदींनी स्वतः कोरोना लस घेऊन देशवासीयांना प्रोत्साहन दिलंय. तसेच कोरोना लसीला विरोध करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिल्याचीही भावना काही युजर्स व्यक्त करत आहेत.
फ़ोटो खिंचवाने के लिए मास्क निकालना जरूरी है?? वाकई हमारे देश का प्रधानमंत्री कैमराजीवी है????
— Manzar Siddiqui ?? (@ManzarKne) March 1, 2021
हेही वाचा :
‘राजकारणी जाड कातडीचे, जनावरांची सुई वापरणार आहात का?’ मोदींना लस टोचता टोचता नर्स खुदूखुदू हसली
व्हिडीओ पाहा :