मग तुम्ही सरळ भाजपला मतदान करा… काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याने खळबळ
टीएमसीने अधीर रंजन चौधरी यांचा व्हिडिओ शेअर करताना त्यांना भाजपची ‘बी-टीम’ म्हटले आहे. एक बंगाल-विरोधकच भाजपचा प्रचार करु शकतो. आता त्यांना बहरामपूरमधील जनता 13 मे रोजी उत्तर देणार आहे. टीएमसी खासदार राज्यसभा सदस्य साकेत गोखले यांनीही अधीर रंजन चौधरी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचारात अनेक रंजक घटना घडत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु एकाच आघाडीत असलेल्या पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली जात नाही. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि बहरामपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अधीर रंजन चौधरी यांनी सरळ तृणमूल काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान करण्याचे म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूल आक्रमक झाला आहे. तृणमूलने अधीर रंजन यांना भाजपची बी-टीम म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बंगालमध्ये भाजपच्या जागा कमी करणे हेच पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी टीएमसी ‘इंडिया’ आघाडीचा भाग असल्याची सरवासारव केली आहे.
तृणमूलची आक्रमक प्रतिक्रिया
अधीर रंजन चौधरी यांचा एका सभेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तृणमूल काँग्रेसने आपल्या X अकाउंटवरुन टि्वट केला आहे. या व्हिडिओमध्ये अधीर रंजन चौधरी टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान करण्याचे वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यावर तृणमूल काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. त्यात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागा वाटप न होण्यामागे अधीर रंजन चौधरीच जबाबदार आहे. ते बंगाला विरोधक आहेत. ते भाजपचे डोळे आणि कान म्हणून काम करत आहेत. तसेच भाजपचा प्रचार करत आहेत.
अधीर रंजन चौधरी भाजपची बी-टीम
टीएमसीने अधीर रंजन चौधरी यांचा व्हिडिओ शेअर करताना त्यांना भाजपची ‘बी-टीम’ म्हटले आहे. एक बंगाल-विरोधकच भाजपचा प्रचार करु शकतो. आता त्यांना बहरामपूरमधील जनता 13 मे रोजी उत्तर देणार आहे. टीएमसी खासदार राज्यसभा सदस्य साकेत गोखले यांनीही अधीर रंजन चौधरी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संस्थांविरुद्ध संपूर्ण ताकदीने लढा देत आहे.
After acting as eyes & ears of @BJP4India in Bengal, @adhirrcinc has now been promoted to be the voice of the BJP in Bengal.
Listen to how the B-Team member is openly asking people to vote for the BJP – a party that REFUSED to release Bengal's rightful due & deprived our people… pic.twitter.com/yVJg7EU7KR
— All India Trinamool Congress (@AITCofficial) May 1, 2024
दुसरीकडे काँग्रेसचे नेते उघडपणे भाजपसाठी मतदान मागत आहेत. बंगालमध्ये टीएमसी ‘इंडीया’ आघाडीच्या वतीने भाजपविरुद्ध लढवत आहे. परंतु काँग्रेस आणि सीपीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निष्ठावंत बनत आहे. हे घृणास्पद आणि निर्लज्जपणाच्या पलीकडे आहे.