Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाविरोधात राहुल गांधी-शरद पवारांनी एकत्र यावं, काँग्रेस वर्किंग कमिटीही आता समर्थनार्थ

राहुल गांधी आणि शरद पवारांनी एकत्र यावं या शिवसेनेच्या सल्ल्याला काँग्रेस वर्किंग कमिटीचे (Congress Working Committee-CWC) सदस्य दिनेश गुंडू राव यांनी पाठिंबा दिला.

भाजपाविरोधात राहुल गांधी-शरद पवारांनी एकत्र यावं, काँग्रेस वर्किंग कमिटीही आता समर्थनार्थ
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 4:19 PM

नवी दिल्ली : शिवसेनेने आपलं मुखपत्र ‘सामना’ संपादकीयमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात हात घालून सत्ताधारी भाजपचा सामना करण्याचा सल्ला दिला. याला काँग्रेस वर्किंग कमिटीचे (Congress Working Committee-CWC) सदस्य दिनेश गुंडू राव यांनी शुक्रवारी (25 जून) पाठिंबा दिला. शिवसेनेने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि शरद पवार (Sharad Pawar) सोबत आल्यास विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपचा सामना करता येईल, असं म्हटलंय (Congress leader Dinesh Gundu Rao support Rahul Gandhi Sharad Pawar together).

काँग्रेस नेते राव (Dinesh Gundu Rao) सध्या गोवा, तामिळनाडू आणि पुडुचेरीचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रभारी आहेत. ते म्हणाले, “शिवसेनेच्या प्रस्तावाचं मी समर्थन करतो. हा चांगला सल्ला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी राहुल गांधी आणि शरद पवार एकमेकांच्या संपर्कात येतील असा मला विश्वास आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये 20 वर्षांपासून आघाडी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील आमचे संबंध मजबूत आहेत. राहुल गांधी आणि शरद पवार लवकरच यावर मार्ग काढतील.”

भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग

शिवसेनेने ‘सामना’च्या संपादकीयमध्ये म्हटलं, “राहुल गांधी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांसोबत हात मिळवणी करायला ही. शरद पवार सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतात. यानंतर नेतृत्वाचा प्रश्न तयार होतो. मात्र, काँग्रेसचा नेतृत्व म्हणून विचार करावा तर सध्या काँग्रेस विना अध्यक्ष आहे.”

शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक

दरम्यान, याआधी राष्ट्रमंचने शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी देशातील अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलसह अनेक पक्षांच्या नेते सहभागी झाले होते. या बैठकीत भाजपविरोधी आघाडीची रणनीती ठरल्याचीही चर्चा आहे.

हेही वाचा :

काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?, काँग्रेस नेत्याचा सवाल

‘मराठवाड्यात शिवसेना क्षीण, ठोकशाहीला जनता भीक घालणार नाही’, आमदार सुरेश धसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, जयंत पाटलांचा टोला

व्हिडीओ पाहा :

Congress leader Dinesh Gundu Rao support Rahul Gandhi Sharad Pawar together

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.