मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपती नियुक्ती, इंडिया आघाडीचा महत्त्वाचा निर्णय

विरोधकांकडून विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड केली जाईल? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर याबाबतची मोठी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.

मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपती नियुक्ती, इंडिया आघाडीचा महत्त्वाचा निर्णय
राहुल गांधी
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 10:00 PM

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे. इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण असणार? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर राहुल गांधी हेच विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत घोषणा केली. राहुल गांधी हे लोकसभेत विरोधकांची बाजू कणखरपणे मांडणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून पुरेशा जागा न मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेता लोकसभेत नव्हता. पण आता इंडिया आघाडीला देखील चांगल्या जागांवर यश मिळाल्यामुळे आता विरोधकांच्या बाजूने विरोधी पक्षनेता असणार आहे.

याआधी पार पडलेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांनंतर नियमानुसार लोकसभेत विरोधी पक्षनेता हे पद कुणाला मिळालं नव्हतं. त्यामुळे विरोधकांची बाजू प्रखरपणे मांडण्यात विरोधक कुठेतरी कमी पडत आहेत, अशी चर्चा नेहमी व्हायची. पण आता तसं होणार नाही. कारण आता इंडिया आघाडीच्या 240 पेक्षा जास्त जागा जिंकून आल्या आहेत. खरंतर लोकसभेत विरोधी पक्षनेता पदासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागांवर निवडून येणं आवश्यक असतं. याचाच अर्थ लोकसभेच्या 543 जागांपैकी 55 जागा तरी विरोधी पक्षाने जिंकलेल्या असायला हव्यात.

काँग्रेसने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 44 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 च्या लोकसभेत 52 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतापदापासून लांब राहावं लागलं. पण यावेळी काँग्रेसला 99 जागांवर यश मिळालं आहे. तसेच सांगलीच्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या 100 जागा आहेत. त्यामुळे यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. इंडिया आघाडीकडून या निवडणुकीत कुणाला विरोधी पक्षनेता म्हणून संधी दिली जाईल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेता पदासाठी निवड झाल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.