Israel-Hamas War भारत सरकारच्या भूमिकेवर काँग्रेसचा ‘हा’ नेता दु:खी

Israel-Hamas War | इस्रायल आणि हमास युद्धात भारत सरकारने जी भूमिका घेतलीय. त्यावर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका सुरु आहे. . "हमासने महिला आणि मुलांवर जे अत्याचार केले, त्याच कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. पण....

Israel-Hamas War भारत सरकारच्या भूमिकेवर काँग्रेसचा 'हा' नेता दु:खी
israel-hamas war
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 5:48 PM

नवी दिल्ली : गाझा पट्टीतील रुग्णालयावर मंगळवारी रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. इस्रायल-हमास युद्धात भारत सरकारची जी भूमिका आहे, त्यावर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका सुरु आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी या विषयात भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. आपल्या सरकारची भूमिका खूपच निराशाजनक असल्याचं वेणूगोपाल म्हणाले. “निरपराध, असहाय्य महिला, मुल या युद्धात भरडली जात आहेत. भारत सरकार या विरोधात कठोर भूमिका का घेत नाही?. इस्रायल-पॅलेस्टाइन मुद्दावर भारत सरकारची भूमिका खूपच निराशाजनक आहे” असं केसी वेणूगोपाल फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले.

युद्धाबद्दलची भारताची भूमिका सुरुवातीपासून वेगळी होती, असं वेणूगोपाल म्हणाले. “इस्रायल-हमास युद्धात निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागतायत. ही गंभीर बाब आहे. जे कोणी यामागे आहेत, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे” असं एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “भारताने नेहमीच पॅलेस्टाइन मुद्याच समर्थन केलय. त्यांच्या हक्काची पाठराखण केलीय” असं वेणूगोपाल फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात. “कुठल्याही प्रकारची आक्रमकता किंवा आक्रमतेला तसच उत्तर याचा भारताने नेहमीच निषेध केलाय. दुर्देवाने सध्याची भारताची भूमिका युद्धाच्या समाप्तीसाठी पुरेशी नाहीय” असं वेणूगोपाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय. “आदर आणि सन्मानाने तुम्ही या विषयावर आपली मत मांडा” असं राज्यसभा खासदार वेणूगोपाल म्हणाले.

ते अशा परिस्थितीपर्यंत का आले?

“इस्रायल असो किंवा पॅलेस्टाइन दोघांना आंतरराष्ट्रीय मानवधिकार कायद्याच पालन करण बंधनकारक आहे” असही त्यांनी म्हटलय. “हमासने महिला आणि मुलांवर जे अत्याचार केले, त्याच कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. पण ते अशा परिस्थितीपर्यंत का आले? त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहण सुद्धा आवश्यक आहे” असं वेणूगोपाल यांनी म्हटलय. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. हे युद्ध तूर्तास लवकर थांबण्याची शक्यता वाटत नाहीय. हे युद्ध आणखी तीव्र होईल, त्याचा विस्तार अधिक होईल अशी शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.