आता मनीष तिवारींच्या पुस्तकावरून वाद, 26/11 नंतर PAK वर कारवाई न करणे मनमोहन सरकारची कमजोरी होती, भाजपने मागितले उत्तर
मनीष तिवारी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात लिहिले आहे की, मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. ही अशी वेळ होती जेव्हा कारवाई करणे आवश्यक होते. एक देश (पाकिस्तान) निरपराध लोकांना मारतो आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाही, असे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.
नवी दिल्लीः कॉंग्रेस ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांचं एक पुस्तक प्रकाशीत होणार आहे, ज्याच्यावरून वाद निर्माण झाला आहे. नव्या पुस्तकात तिवारी यांनी आपल्याच सरकारच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कारवाई न करणे हे यूपीए सरकारचे कमजोरीपणा आहे, असं व्यक्तव्य त्यांनी केले आहे. मनीष तिवारींच्या नवीन पुस्तकाचे नाव 10 Flash Points, 20 Years असं आहे. या नव्या पुस्तकावर भारतीय जनता पक्षही आक्रमक झाला असून सोनिया गांधींना मौन तोडून उत्तर देण्याची मागणी केली आहे.
मनीष तिवारी यांनी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला आहे. 26/11 ची परिस्थिती हाताळल्याबद्दल तिवारी यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, 26/11 असो वा अन्य कोणताही विषय, एकूण परिस्थिती कशी हाताळली गेली हे देशाला माहित आहे. मला या प्रकरणाचे राजकारण करायचे नाही. मोदी सरकारचे धोरण दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे आहे.
Be it 26/11 or others, country knows how overall situation was handled.Don’t want to politicise.Policy of Modi govt is of zero tolerance towards terrorism: Union Min Pralhad Joshi on Manish Tewari’s book where he reportedly questioned his own govt over handling of 26/11 situation pic.twitter.com/PdiirGwRAm
— ANI (@ANI) November 23, 2021
मनीष तिवारी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात लिहिले आहे की, मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. ही अशी वेळ होती जेव्हा कारवाई करणे आवश्यक होते. एक देश (पाकिस्तान) निरपराध लोकांना मारतो आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाही, असे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. यानंतरही जर आपण संयम बाळगत राहिलो तर ते ताकदीचे नसून दुर्बलतेचे लक्षण आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांनी 26/11 च्या हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याशी केली आहे.
Happy to announce that my Fourth Book will be in the market shortly – ’10 Flash Points; 20 Years – National Security Situations that Impacted India’. The book objectively delves into every salient National Security Challenge India has faced in the past two decades.@Rupa_Books pic.twitter.com/3N0ef7cUad
— Manish Tewari (@ManishTewari) November 23, 2021
मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकाचा वाद समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तत्कालीन यूपीए सरकारचे हेतू वाईट असल्याचे म्हटले. भाटिया म्हणाले की, तत्कालीन एअर चीफ मार्शल म्हणाले होते की, आमचे हवाई दल प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे, परंतु कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली नाही. यावर आता काँग्रेसने उत्तर द्यावे.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर त्यांना भारताच्या अखंडतेचीही चिंता वाटत नाही. आज काँग्रेसच्या राजवटीत मंत्री राहिलेल्या मनीष तिवारी यांनी आपल्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावल्याची कबुली दिली आहे. ते विचारले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जी, आज राहुल गांधी आपले मौन तोडणार का?
अमित मालवीय यांनी ट्विटमध्ये काल मणिशंकर अय्यर यांनी संरक्षण खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आज मनीष तिवारी यांनी 26/11 रोजी यूपीएच्या कमकुवत प्रतिसादाबद्दल खेद व्यक्त केला.
इतर बातम्या-