राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसोबत साजरी केली दिवाळी; पहा जेवणासाठी काय केले ऑर्डर?

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कन्याकुमारीमधील सेंट जोसेफ मॅट्रीक स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजीर केली. या वर्षाच्या सुरुवातीला देखील राहुल गांधी यांनी या शाळेला भेट दिली होती.

राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसोबत साजरी केली दिवाळी; पहा जेवणासाठी काय केले ऑर्डर?
देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 1:27 PM

चेन्नई – काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कन्याकुमारीमधील सेंट जोसेफ मॅट्रीक स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजीर केली. या वर्षाच्या सुरुवातीला देखील राहुल गांधी यांनी या शाळेला भेट दिली होती. याच शाळेमध्ये राहुल गांधी यांना पुश-अपचे चॅलेंज करण्यात आले होते, राहुल गांधींनी ते चॅलेंज स्वीकारले देखील होते. पुन्हा एकदा दिवाळी निमित्त राहुल यांनी या शाळेला भेट दिली, आणि विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांशी संवाद 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना मुलांनी विविध प्रश्न विचारले. तुम्ही जर पंतप्रधान झाले तर सर्वात प्रथम कोणती गोष्ट करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले की, सर्वप्रथम मी स्त्रीयांना आरक्षण देईल. भारतातील स्त्री ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये, तीने स्वत:च्या पायावर उभे राहावे असे आपल्याला वाटत असल्याचे यावेळी ते म्हणाले.  दुसऱ्या एका विद्यार्थ्यांने त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही मुलांना काय शिकवू इच्छिता. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले की मी मुलांना नम्रता शिकवेन, नम्रता हा जगातील सर्वात मोठा गुण आहे. ज्यांच्या आंगी नम्रता असते त्याचा जगात कोणीही पराभव करू शकत नाही.

मुलांसोबत भोजनाचा आनंद 

त्यांनी या विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा देखील अस्वाद घेतला. राहुल गांधी यांचे तामिळनाडूमधील मित्र त्यांच्यासाठी खास दिल्लीमध्ये मिळणाऱ्या जेवणाची व्यवस्था करणार होते. मात्र राहुल गांधी यांनी त्यांना तसे न करण्यास सांगितले. त्यांनी जेवणासाठी छोले -भटूरे आणि कुल्फीची ऑर्डर दिली. राहुल यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत  एकत्रीतपणे भोजन केले. त्याचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.  हा व्हिडीओ ट्विट करताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशातील विविधता हीच आपली सर्वात मोठी ताकत आहे. आज  दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा संगम झाला. या व्हिडीओमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील दिसत आहेत.

संबंधित बातम्या 

Ramayana Yatra Express : आयआरसीटीसी 16 नोव्हेंबरला रामायण यात्रा सुरु करणार, कशी असेल संपूर्ण यात्रा?

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का, दिल्लीत आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; मोदी-शहा आखणार नवी रणनीती

Bihar Liquor Deaths: बनावट दारू प्यायल्याने मृत्यूतांचा आकडा 42 वर; 19 दारू विक्रेत्यांना अटक, 2 अधिकारी निलंबित

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.