निमंत्रण मिळूनही काँग्रेस नेते राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनादेखील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण असतानाही राम मंदिराच्या उद्घाटनाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

निमंत्रण मिळूनही काँग्रेस नेते राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत
Rahul Gandhi-Sonia gandhi
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 4:50 PM

संदीप राजगोळकर नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार आहे. अयोध्येत गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराची मागणी केली जात होती. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर अनेक वर्ष सुनावणी पार पडली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राम मंदिराबाबत सकारात्मक निर्णय दिला. त्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारण्यात आलं आहे. येत्या 22 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाचं जगभरातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनादेखील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण असतानाही राम मंदिराच्या उद्घाटनाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत स्पष्टीकरण जारी करण्यात आली आहे. आम्ही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापन कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानाने अस्वीकार केलं आहे. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर कोणताही काँग्रेस नेता सहभागी होणार नाही, असं काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसने नेमकं काय म्हटलंय?

काँग्रेसचे महासिचव जयराम रमेश यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांना 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण गेल्या महिन्यात आलं आहे. आपल्या देशात लाखो भक्त प्रभू श्रीरामांची पूजा करतात. पण भाजप आणि आरएसएसने गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराला राजकीय प्रोजेक्ट बनवलं आहे, असं जयराम रमेश म्हणाले आहेत.

भाजप आणि आरएसएस नेत्यांकडून निवडणूक तोंडावर ठेवून अपूर्ण बांधकाम राहिलेल्या राम मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे हे स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्या 2019 चा निकालाचं पालन करत, आणि प्रभू श्रीरामांचा सन्मान करणाऱ्या लाखो भाविकांच्या भावनांचा आदर करुन मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी आरएसएस आणि भाजपच्या कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानाने अस्वीकार केलं आहे, असं जयराम रमेश म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.