‘देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXXX’, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकारण तापताना दिसत आहे. सुशीलकुमार शिंदे कधी एकेकाळी देशाचे गृहमंत्री राहिलेले आहेत. पण शिंदे यांना गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.

'देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXXX', सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 7:39 PM

काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरबद्दल केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना काश्मीर गेल्यावर आपली मानसिक अवस्था काय होती, याबाबत भाष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या हाती आयतं कोलित सापडलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस सरकारच्या काळात काश्मीरमध्ये जास्त दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडायच्या. पण आता भाजप सरकारच्या काळात काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे, असा दावा भाजपकडून केला जातोय.

सुशीलकुमार शिंदे नेमकं काय म्हणाले?

‘मी गृहमंत्री असताना त्यापूर्वी मी विजय धर यांच्याकडे जायचो आणि त्यांच्याकडून सल्ला घ्यायचो, त्यांनी मला सल्ला दिला की सुशील, इकडे तिकडे भटकू नकोस. तू लाल चौकात जा आणि तिथे भाषण कर. काही लोकांना भेट आणि डल झील फिरायला जा. त्या सल्ल्यातून मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि लोकांमध्ये संदेश गेला की, असा गृहमंत्री आहे जो न घाबरता जातो, पण माझी @#$%@ (आक्षेपार्ह शब्द). मी कोणाला सांगू”, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. “मी हे तुम्हाला फक्त हसवण्यासाठी सांगितले, पण एक माजी पोलीस अधिकारी असे बोलू शकत नाही”, असंही शिंदे यावेळी म्हणाले. सुशिलकुमार शिंदे यांच्या ‘पाच दशकांचे राजकारण’ या आत्मचरित्राचं राजधानी दिल्लीत प्रकाशन झालं. यावेळी ते बोलत होते.

भाजपकडून मोठा दावा

सुशीलकुमार शिंदे यांच्या संबंधित वक्तव्यानंतर भाजपकडून मोठा दावा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती होती हे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं. शिंदे यांच्या वक्तव्याकडे काँग्रेसने लक्ष द्यावं, असं भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केलं आहे. “जम्मू-काश्मीरमध्ये आता दहशतवाद आणि फुटीरतावादाचं कंबरडं मोडलं गेलं आहे. आज लाल किल्ल्यापासूल लाल चौकापर्यंत देशाचा तिरंगा फडकतोय. दहशतवाद आणि दगडफेकीत प्रचंड घट झाली आहे. जिथे आधी गोळ्या झाडल्या जायच्या, आता तिथेच क्रिकेट खेळलं जातं”, असा दावा भाजपने केला.

सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने काही प्रश्न उपस्थित

सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. काश्मीर आता बदललं आहे हे सुशीलकुमार शिंदे यांना मान्य आहे का? काश्मीर आता सुरक्षित आहे असं सुशीलकुमार शिंदे यांना वाटतंय? सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या या वक्तव्यातून कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचं कौतुक केलं? शिंदे यांनी या वक्तव्यातून काश्मीरमध्ये मोदी सरकारच्या चांगल्या धोरण असल्याचं मान्य केलं आहे? काँग्रेस सरकारच्या तुलनेत आता काश्मीर खोऱ्यात सुरक्षेत चांगले बदल झाल्याचं शिंदे यांना मान्य आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये किती बदल झाला?

काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी आणि दगडफेकीच्या विरोधात तीव्र कारवाई करण्यात आली. काश्मीरमध्ये 2015 ते 2019 या कालावधीत दगडफेकीच्या 5063 घटनांची नोंद झाली होती. तर 2019-2023 दरम्यान केवळ 434 घटनांची नोंद झाली होती. त्याचवेळी, 2015-2019 दरम्यान 740 दहशतवादी मारले गेले, तर 2019-2023 दरम्यान 675 दहशतवादी मारले गेले होते. जर आपण सुरक्षा जवानांच्या जीवितहानीबद्दल बोललो, तर 2015-2019 दरम्यान 379 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आणि 2019-2023 मध्ये 146 जवान शहीद झाले.

पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी.
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी.
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?.
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी.
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला.