Income Tax Raid | 40 मशीन तीन दिवसांपासून मोजताय नोटा, आतापर्यंत 250 कोटी, अजून किती बाकी…

Income Tax Raid | बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड ही मद्य बनवणारी कंपनी आहे. आयकर विभागाने या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांची ही कंपनी आहे. छाप्यात आतापर्यंत 250 कोटी रुपये मिळाले आहे. अजून नोटा मोजणी पूर्ण झाली नाही.

Income Tax Raid | 40 मशीन तीन दिवसांपासून मोजताय नोटा, आतापर्यंत 250 कोटी, अजून किती बाकी...
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 4:03 PM

नवी दिल्ली | 9 डिसेंबर 2023 : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याकडे आयकर विभागाचे छापे पडले होते. सहा डिसेंबर रोजी ओडिशा आणि झारखंडमध्ये हे छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात सापडलेल्या रक्कमेची मोजणी तीन दिवसांपासून सुरु आहे. 40 मशीन नोटा मोजत आहेत. तरीही अजून नोटा मोजणी पूर्ण झाली नाही. आतापर्यंत 250 कोटी रुपयांची मोजणी पूर्ण झाली आहे. अजून 136 पॅकेटची मोजणी राहिली आहे. यामुळे हा आकडा 500 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तीन सुटकेस भरुन ज्वेलरी

बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) ही कंपनी मद्य बनवणारी आहे. आयकर विभागाने या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी रक्कम मिळाली आहे. तपास संस्थांना आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. ओडिशामधील सरकारी बँकेचे कर्मचारी तीन दिवसांपासून 40 मशीनवर मोजणी करत आहे. अजून 250 कोटी रक्कम मोजली गेली आहे. तसेच या ठिकाणी तीन सुटकेस भरुन ज्वेलरी मिळाली आहे. यामुळे ही सर्व रक्कम 500 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

आयकर विभागाचे शंभर अधिकारी

आयकर विभागातील 100 अधिकारी चौथ्या दिवशीही थांबले आहे. बँकेचे कर्मचारी 40 मशीनवर सतत मोजणी करत आहेत. अजून 136 पॅकेट मोजणे बाकी आहे. आतापर्यंत केवळ 40 पॅकेटची मोजणी झाली आहे. आयकर अधिकाऱ्यांना एकूण 176 बॅग मिळाल्या होत्या. छाप्यात मिळालेल्या जास्तीत जास्त नोटा 500 रुपयांच्या आहेत.

हे सुद्धा वाचा

हा पैसा काँग्रेस नेत्यांच्या – भाजप

आयकर छाप्यात मिळत असलेला पैसा हा काँग्रेस नेत्यांचा असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजपचे खासदार संजय सेठ यांनी आतापर्यंत ३०० कोटी जप्त झाल्याचा दावा केला आहे. नोटा मोजताना मशीन खराब होत आहे, परंतु पैसे संपत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. साहू यांच्याकडे हे पैसे कुठून आले, हे राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सांगावे, असे खासदार सेठ यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला....
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला.....
विरोधकांना मला पाडायचं होतं तर..., रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भावूक
विरोधकांना मला पाडायचं होतं तर..., रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भावूक.
'माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम...', दादांचे आर. आर. पाटलांवर आरोप
'माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम...', दादांचे आर. आर. पाटलांवर आरोप.
बिचुकले पुन्हा रिंगणात, बारामतीतून लढणार विधानसभा; पवाराचं टेन्शन वाढल
बिचुकले पुन्हा रिंगणात, बारामतीतून लढणार विधानसभा; पवाराचं टेन्शन वाढल.
पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?
पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?.
ठाकरेंची माफी, माझी चूक.., नॉट रिचेबल होण्यापूर्वी वनगांची प्रतिक्रिया
ठाकरेंची माफी, माझी चूक.., नॉट रिचेबल होण्यापूर्वी वनगांची प्रतिक्रिया.
'वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा....' पत्नी चिंतेत
'वनगा टेन्शनमध्येच होते, ते म्हणाले जगून काय फायदा....' पत्नी चिंतेत.
'शिंदेंनाही रडू कोसळेल, येत्या 26 तारखेनंतर..', राऊतांचा मोठा दावा काय
'शिंदेंनाही रडू कोसळेल, येत्या 26 तारखेनंतर..', राऊतांचा मोठा दावा काय.
कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, भुजबळ म्हणाले....
कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, भुजबळ म्हणाले.....
नवाब मलिक विधानसभेच्या रिंगणात उतरणार, कोणाकडून मिळाला AB फॉर्म?
नवाब मलिक विधानसभेच्या रिंगणात उतरणार, कोणाकडून मिळाला AB फॉर्म?.