Rahul Gandhi | महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना राहुल गांधींनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खेचला, मोदी सरकारवर घणाघात

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर भूमिका मांडत असताना ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खेचला. त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या भूमिकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका मांडली.

Rahul Gandhi | महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना राहुल गांधींनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खेचला, मोदी सरकारवर घणाघात
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 6:51 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडल्यानंतर आज लोकसभेत या विधेकावर चर्चा झाली. काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. पण तरीही हे विधेयक काही गोष्टींमुळे अपूर्ण आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी या आरक्षणात ओबीसी आरक्षणाचा उल्लेख नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर चांगलाच घणाघात केला. तसेच महिला आरक्षण विधेयक आत्ताच का लागू करत नाहीत? असा सवाल राहुल गांधींनी सरकारला केला.

“स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण मोठं पाऊल होतं. महिला आरक्षण विधेयक आत्तापासून लागू का करत नाही? जातीय जनगणनेपासून लक्ष वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आपल्या संस्थांमध्ये ओबीसींना अतिशय कमी स्थान आहे. देशातील 90 पैकी केवळ 3 सचिव हे ओबीसी आहेत”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.ट

राहुल गांधी लोकसभेत नेमकं काय म्हणाले?

“मी आज महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी उभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण मोठं पाऊल होतं. स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे लोकांना अधिकार देणं. पण माझ्या नरजेसमोर हे विधेयक अपूर्णच आहे. मोदी सरकारच्या भाषेत मला अहंकार दिसतोय”, अशी टीका राहुल गांधींनी केली.

“या विधेयकात ओबीसी आरक्षणाचा उल्लेख असायला हवा होता. पण तो उल्लेख गायब आहे. जनगणना होण्याआधी या विधेयकाला लागू करायला हवं. हा कार्यक्रम चांगला आहे. पण आजच्या कार्यक्रमात देशाच्या महिला राष्ट्रपतींना देखील असायला हवं होतं. विरोधी पक्ष जेव्हा जातीनिहाय जनगणनेचा मागणी करतो, तेव्हा सरकारकडून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो”, असं राहुल गांधी म्हणाले.

“महिलांना आणखी जागा मिळायला हव्यात. मी या विधेयकाचं समर्थन करतो पण हे विधेयक अजून अपूर्ण आहे. या विधेयकात ओबीसी आरक्षणाबाबत काहीच उल्लेख नाही. केंद्र सरकारच्या विविध संस्थांमध्ये असणाऱ्या 90 सचिवांपैकी किती सचिव हे ओबीसी समाजाचे आहेत? मी सांगतो, 90 पैकी फक्त 3 ओबीसी सचिव आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.