शादी की बात! भावी पत्नी कशी असावी?; राहुल गांधी यांची पहिल्यांदाच ‘मन की बात’

पप्पू म्हणणं हा प्रोपोगंडा कॅम्पेनचा भाग आहे. काही लोक घाबरून गेले आहेत. त्यामुळे ते असं बोलत आहेत. त्यांच्या आयुष्यात काहीच घडत नाहीये. ते दु:खी आहेत.

शादी की बात! भावी पत्नी कशी असावी?; राहुल गांधी यांची पहिल्यांदाच 'मन की बात'
शादी की बात! भावी पत्नी कशी असावी?; राहुल गांधी यांची पहिल्यांदाच 'मन की बात'Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 6:56 AM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रे दरम्यान राहुल गांधी अनेक लोकांना भेटत आहेत. अनेकांशी चर्चा करत आहेत. विविध वर्गातील लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्याशी हितगूज साधून त्यांच्यात आपुलकी निर्माण करत आहेत. यावेळी नागरिकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही ते देत आहेत. यावेळी एका इंटरव्ह्यूववेळी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी पहिल्यांदाच मनमोकळेपणानं उत्तर दिलं. त्यांना कशी पत्नी हवीय याची माहिती राहुल गांधी यांनी दिली.

राहुल गांधी यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपली आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे गुण असलेली मुलगी भावी पत्नी म्हणून हवी आहे, असं स्पष्ट सांगितलं.

हे सुद्धा वाचा

माझी आजी इंदिरा गांधी मला प्रचंड प्रिय आहे. इंदिरा गांधी फक्त माझी आजी नसून मला आईसारखीच आहे, असं ते म्हणाले. आपल्या आजीचे गुण असलेल्या मुलीशीच तुम्ही विवाह करणार आहात का? असा सवाल केला असता हा अत्यंत चांगला प्रश्न असल्याचं ते म्हणाले.

ज्या मुलीत माझी आई आणि आजीचे गुण असतील अशाच मुलीशी मला विवाह करायचा आहे. तेच चांगलं राहील, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी आपली ही मुलाखत ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.

टीकाकारांकडून राहुल गांधी यांना वेगवेगळ्या नावाने हिणवले जाते. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. मला त्याची काहीच पर्वा नाही. मला कुणी कोणत्याही नावाने बोलावं. मला काही फरक पडत नाही. मी कुणाचा द्वेष करत नाही. मला शिव्या द्या किंवा मारा, मी तुमचा द्वेष करणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

पप्पू म्हणणं हा प्रोपोगंडा कॅम्पेनचा भाग आहे. काही लोक घाबरून गेले आहेत. त्यामुळे ते असं बोलत आहेत. त्यांच्या आयुष्यात काहीच घडत नाहीये. ते दु:खी आहेत. कारण त्यांच्या आयुष्यातील नाते संबंध चांगले नाहीयेत.

त्यामुळेच ते दुसऱ्यांना शिव्याशाप देत असतात. मी त्यांचं स्वागत करतो. ते मला शिव्याशाप देऊ शकतात. मला अजून इतरही नावे ठेवू शकतात. मला त्याने काहीच फरक पडत नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

यावेळी त्यांनी त्यांच्या सायकलच्या छंदाविषयीही सांगितलं. मला कारचा संग्रह करण्यात थोडीही रूची नाही. मला मोटारबाईकही आवडत नाही. पण मोटार बाईक चालवायला मला आवडतं. मी कार रिपेअर करू शकतो, पण मला कारचं वेड नाहीये.

मला सायकल चालवायला अधिक आवडतं. मला वेगाने चालणं, हवेत उडणं, पाण्यात वाहून जाणं आणि जमिनीवरून वेगाने पुढे जाण्याचा विचार अधिक भावतो, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.