Congress President कोण? आज थरूर विरुद्ध खरगे मुकाबला, मतदानाला सुरुवात पाहा Video
काँग्रेसचे देशभरातील 9200 प्रतिनिधी विविध राज्यांतील मुख्यालयांमध्ये मतदान केंद्रांवर अध्यक्षपदासाठी मतदान करतील.
नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीना (PM Narendra Modi) तगडं आव्हान मिळेल का, यासाठी काँग्रेसमधील आजची घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. 37 वर्षानंतर आज प्रथमच काँग्रेसमध्ये गांधी घरण्याबाहेरचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची (Congress President Election) निवडणूक आज होतेय. सकाळी दहा वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. शशी थरुर(Shashi Tharur) आणि मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) या दोघांमध्ये हा सामना रंगणार आहे.
आज सकाळी दहा वाजेपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे.
काँग्रेसचे देशभरातील 9200 प्रतिनिधी विविध राज्यांतील मुख्यालयांमध्ये मतदान केंद्रांवर अध्यक्षपदासाठी मतदान करतील.
हे मतदान बॅलेट पेपरवर होते. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातही हे मतदान होईल.
महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात….पाहा Video
The voting for Congress president post underway at Tilak Bhavan, Mumbai. Many Congress leaders queuing to exercise their vote. Congress leader @kharge & @ShashiTharoor thrown their hat for Congress president post election. @NewIndianXpress @TheMornStandard pic.twitter.com/WDKpnkvBhA
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) October 17, 2022
भारत जोडो यात्रेतील काँग्रेस नेत्यांसाठी कर्नाटकात विशेष बूथ तयार करण्यात आले आहे.
बॅलेट पेपरवर दोन उमेदवारांची नावं असतील, त्यातील एका नावासमोर मतदारांना टिक मार्क करायचे आहे.
Congress President Poll pic.twitter.com/AWRNKDTY4t
— With Congress (@WithCongress) October 17, 2022
आज सोमवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन काँग्रेस अध्यक्षपदाचे नाव घोषित केले जाईल.
बहुतांश नेत्यांचा मल्लिकार्जून खरगे यांना पाठींबा असल्याचं म्हटलं जातंय. तर काहींच्या मते या निवडणुकीत क्रॉस वोटिंगदेखील होऊ शकते.
तिरुअनंतपूरम येथील नेते शशी थरुर बुद्धिजीवी वर्गात गणले जातात. त्यांनी तीन वेळा खासदारकी भूषवली आहे.
थरूर यांनी 23 पुस्तकं लिहिली असून संयुक्त राष्ट्रात ते इंटरनॅशनल सिव्हिल सर्वंटदेखील होते. सध्या ते तिरुअनंतपूरम लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. दक्षिण भारतातील काँग्रेसवर त्यांची पकड आहे.
तर देशभरातील विरोधी पक्षांशी मल्लिकार्जून खरगे यांचा संपर्क आहे. तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी, माकपा महासचिव सीताराम येच्युरी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
खरगे 9 वेळा आमदार तर 2 वेळा खासदार झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या विरोधी पदावरून राजीनामा दिला आहे.