Video: शिवराजसिहांना रोखलं तर योगींना पायी चालवलं? मोदींसोबतचे हे दोन video का चर्चेत? काँग्रेसकडून ट्विट

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन व्हिडीओ खूप चर्चेत आहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा आणि दुसरा म्हणजे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतचा.

Video: शिवराजसिहांना रोखलं तर योगींना पायी चालवलं? मोदींसोबतचे हे दोन video का चर्चेत? काँग्रेसकडून ट्विट
pm-narendra-modi
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 4:40 PM

भोपाळ: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन व्हिडीओ खूप चर्चेत आहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा आणि दुसरा म्हणजे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतचा. या दोन्ही व्हिडीओमध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने हे दोन्ही व्हिडीओ शेअर करून जोरदार हल्ला चढवला आहे.

सोमवारी बिरसा मुंडा जयंती निमित्त भोपाळमध्ये जनजातीय गौरव दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासहीत अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात एक प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रदर्शन पाहत होते. त्यावेळचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विट केला आहे.

काय आहे व्हिडीओत?

पंतप्रधा नरेंद्र मोदी चालत असताना त्यांच्यासोबत चालणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांना मोदींच्या अंगरक्षकांनी बाजूला केले. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का? असा सवाल काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्र्यांशी असं वागणं योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

तर मुख्यमंत्र्यांना रोखण्याची कोण हिंमत करेल?

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनीही ट्विट करून सवाल केला आहे. हे राम… मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा असा अपमान? त्यांच्याच राज्यात आणि सरकारात? मोदींनी आधीच त्यांच्या बॉडीगार्डला हा प्रकार करण्यास सांगितलं होतं. नाही तर एखाद्या मुख्यमंत्र्यांना रोखण्याची कुणाची हिंमत होईल का? यापूर्वी अमित शहांनी जेपी नड्डांसोबत असच केलं होतं, असं लांबा यांनी म्हटलं आहे. तर, साहेब आणि फोटोच्या मध्ये येणं मनाई आहे. मग तो मुख्यमंत्री का असेना? बघा शिवराज सिंह यांना, असा चिमटा काँग्रेस नेते अशोक बसोवा यांनी म्हटलं आहे.

योगी पायी, अखिलेश यांची फटकेबाजी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ मंगळवारी सुल्तानपूरला गेले होते. दोघांनीही पूर्वांचल एक्सप्रेस-वेचं उद्घाटन केलं. यावेळचा एक व्हिडीओ सपा नेते अखिलेश यादव यांनी शेअर केला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत पंतप्रधानांचा ताफा चालताना दिसत आहे. तर त्यांच्या गाडीच्या मागे योगी आदित्यनाथ पायीपायी चालताना दिसत आहेत. त्यावरून अखिलेश यांनी भाजपवर टीका केली आहे. मोदी स्वत: अलिशान गाडीत बसलेत आणि मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर एकटच सोडलंय. हा घोर अपमान आहे, असं ट्विट अखिलेश यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

भाजपच्या नामनिर्देशित सदस्याला स्थायी समितीतून हटवण्यासाठी 1 कोटीची उधळपट्टी; बीएमसीचा अजब कारभार चव्हाट्यावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात हस्तक्षेप करा, पडळकरांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

PM किसान योजनेत अनियमितता, महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांना द्यावा लागणार परतावा

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.