Congress : पाच राज्याच्या पराभवानंतर काँग्रेस करणार आत्मपरीक्षण; राजस्थानमध्ये मे महिन्यात होणार चिंतन शिबिर

पाच राज्यांच्या पराभवानंतर अखेर काँग्रेस पक्ष चिंतन मोडमध्ये आला आहे. त्यासाठी राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये 13 मे ते 15 मे दरम्यान चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात काँग्रेस अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णयाची शक्यता असून, प्रशांत किशोर यांच्या समावेशाबद्दलही उत्सुकता आहे.

Congress : पाच राज्याच्या पराभवानंतर काँग्रेस करणार आत्मपरीक्षण; राजस्थानमध्ये मे महिन्यात होणार चिंतन शिबिर
काँग्रेसचा झेंडा.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:48 AM

नवी दिल्लीः पाच राज्यांच्या पराभवानंतर अखेर काँग्रेस पक्ष चिंतन मोडमध्ये आला आहे. त्यासाठी राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये 13 मे ते 15 मे दरम्यान काँग्रेसने चिंतन शिबिराचे (Congress Chintan Shivir) आयोजन केले आहे. या शिबिरात काँग्रेस अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णयाची शक्यता असून, प्रशांत किशोर यांच्या समावेशाबद्दलही उत्सुकता आहे. या शिबिराला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi), राहुल गांधी, प्रियांका गांधी, प्रशांत किशोर यांच्यासह पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या शिबिरात काँग्रेसचे सर्व खासदार आणि आमदारांनाही बोलावण्यात आले आहे. सोबत पक्षाचे पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. या शिबिरात मिशन 2024 च्या अंतर्गत काँग्रेसच्या अॅक्शन प्लानची माहिती सर्वांना देण्यात येणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला (BJP) कसे घेरायचे आणि सत्तेपर्यंत कसे पोहचायचे याचा मूलमंत्र दिला जाणार आहे.

शिबिर मेवाडमध्ये का?

राजकीय जाणकारच्या होऱ्यानुसार चिंतन शिबिरासाठी उदयपूर म्हणजेच मेवाडची निवड करण्यात आलीय. ज्याप्रमाणे दिल्लीच्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी उत्तर प्रदेश महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे राजस्थानच्या तख्तावर सत्ता मिळवण्यासाठी मेवाडमध्ये विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. स्वतः अशोक गहलोत यांनाही मेवाडमध्ये विजय मिळवण्याची इच्छा आहे. दुसरे कारण म्हणजे हा भाग गुजरातशी जोडलेला आहे. डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभा निवडणूक होतेय. त्यापार्श्वभूमीवर या शिबिरात गुजरातमधील 27 वर्षे जुन्या भाजपच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे नियोजन केले जाणार आहे.

सत्तेचा राजमार्ग कसा?

राजस्थानमध्ये एकूण सात विभाग आहेत. असे म्हणतात की, जर कोणत्या पक्षाने उदयपूर विभागात जवळपास 20 जागा जिंकल्या, तर त्यांना बहुमताचा 101 चा आकडा गाठणे अगदी सुकर होते. शिवाय मेवाड ही महाराणा प्रताप यांची भूमी. ते भारताच्या धर्म आणि संस्कृतीचे मॉडेल म्हणूनही विख्यात आहे. त्यामुळे येथे शिबिर झाले, तर काँग्रेसमध्ये एक नवी ताकद आणि जोश येईल, असा विश्वास पक्षाला वाटतो.

राहुल पुन्हा अध्यक्ष?

काँग्रेसने यापूर्वी 2013 मध्ये जयपूर येथे चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरातही देशभरातील खासदार, आमदार, नेते सहभागी झाले होते. याच शिबिरात राहुल गांधी यांच्या गळ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडली होती. मात्र, 2019 मधील पराभवानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतायत. मात्र, या शिबिरात पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ राहुल यांच्या गळ्यात पडू शकते.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.