अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात काँग्रेस देणार हा तगडा उमेदवार
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. भाजपने मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला तिकीट दिलं आहे. त्यामुळे येथे काँग्रेसने चांगला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मंडीच्या खासदार येथून त्यांच्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
Loksabha election : अभिनेत्री कंगना रनौतला भाजपने मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. हिमाचलची राहणारी कंगना रनौत हिने मतदारसंघात प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. मला अभिनेत्री समजू नका. मी तुमची मुलगी, बहिण आहे असं समजून मला मतदान करा असं आवाहन तिने मतदारांना केले आहे. कंगनाच्या विरोधात काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या दरम्यान एक नवा चर्चेत आलं आहे. ते नाव आहे माजी मुख्यमंत्री विक्रमादित्य सिंह यांचा मुलगा वीरभद्र सिंह यांचं. त्यांनी मंडीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
कोण आहे इच्छूक
विक्रमादित्य सिंह हे या मतदारसंघातून इच्छूक आहेत. त्यांची आई प्रतिभा सिंह यांनी मागील निवडणुकीत मंडीतून विजय मिळवला होता. गेल्या काही दिवसांपासून विक्रमादित्य सिंह यांनी भाजपच्या मंडीतील उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी वाढवल्या आहेत. वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाची मंडीवर खूप मजबूत पकड आहे.
विक्रमादित्य सिंह यांचा हिमाचलच्या तरुणांमध्ये चांगला प्रभाव आहे. त्यांना जर काँग्रेसने येथून उमेदवारी दिली तर येथे स्पर्धा चुरशीची होईल, अशी अपेक्षा आहे. विक्रमादित्य यांच्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे मानले जात आहे. विक्रमादित्य यांनी निवडणूक लढविली आणि विजय मिळवला तर भविष्यात काँग्रेसला आणखी एक चेहरा लोकसभेत मिळेल अशी अपेक्षा आहे.
विक्रमादित्य यांच्या उमेदवारीचा मुद्दा अजून तरी प्रतिक्षेत आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रक्रियेनुसार उमेदवार निश्चित करते. त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. आठवड्याच्या अखेरीस मंडीच्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते. विक्रमादित्य मंडीतून निवडणूक लढवणार असल्याचं प्रतिभा सिंह यांनी म्हटलं आहे. मंडीतील काँग्रेस खासदार प्रतिभा सिंह यांनी यावेळी तिथून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं देखील समजलं आहे.
बंडखोरीची भाजपला चिंता
2022 च्या विधानसभा निवडणुकीत हिमाचलमध्ये भाजपमध्ये मोठी बंडखोरांनी झाली होती. मंडीतूनही भाजप नेत्यांनी बंडखोरी केली होती. भाजपने आता कंगना राणौतला उमेदवारी दिली आहे. तिने प्रचाराला सुरुवात केली आहे. मंडीची जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षातून बाहेर पडलेल्या बंडखोर नेत्यांना पुून्हा पक्षात घेण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांच्या पराभवामुळे आता येथून काँग्रेसला नवा चेहरा देण्यासाठी प्रतिभा सिंह आणि विक्रमादित्य सिंह यांची इच्छा आहे. विक्रमादित्य जिंकून लोकसभेत आले तर काँग्रेस पक्षातील पुढील राजकारण वीरभद्र कुटुंबासाठी खूप चांगले परिणाम देऊ शकते. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. गांधी घराण्याशी त्यांचे विशेष नाते होते. काँग्रेस नेत्यांनाही हे महत्त्व चांगलेच ठाऊक आहे.