थाली बजाव महागाई भगाओ, Congress कडून महागाई मुक्त भारत अभियान जाहीर
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बैठकीत काँग्रेसनं महागाई मुक्त भारत अभियान (Mehngai Mukt Bharat Abhiyan ) जाहीर केलं आहे. काँग्रेसकडून 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी स्थगित करण्यात आलेली पेट्रोल आणि डिझेलची (Petrol Diesel) दरवाढ आता पुन्हा सुरु झालीय. पेट्रोल आणि डिझेलसह गॅसच्या (LPG Gas) किमती देखील वाढल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनं (Congress) महागाई विरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बैठकीत काँग्रेसनं महागाई मुक्त भारत अभियान (Mehngai Mukt Bharat Abhiyan ) जाहीर केलं आहे. काँग्रेसकडून 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसनं थाली बजाव महगाई भगावचा नारा दिला आहे.
काँग्रेसचं महागाई मुक्त भारत अभियान
नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातील बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चला काँग्रेसकडून महागाई विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येईल. महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेसकडून थाली बजावं मंहगाई भगाव चा नारा देण्यात आला आहे.
जिल्हास्तरावर होणार आंदोलन
काँग्रेसकडून महागाई विरोधातील आंदोलन देशभर करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर देखील आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 ते 4एप्रिल जिल्हास्तरावर आंदोलन होणार आहे. काँग्रेसकडून महागाई मुक्त भारत अभियान सुरु करण्यात येणार आहे. हे अभियान 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान सुरु राहिल
Congress to launch ‘Mehngai Mukt Bharat Abhiyan’ on the issue of inflation and fuel price hike from 31st March to 7th April.
— ANI (@ANI) March 26, 2022
राज्यांच्या राजधानीत आंदोलन
महागाई मुक्त भारत अभियान काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे. या आंदोलानाची सुरुवात 31 मार्चला होणार आहे. तर, समारोप 7 एप्रिलला होणार आहे. काँग्रेसकडून देशातील राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये 7 एप्रिलला आंदोलन करण्यात येणार आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.
इतर बातम्या: