रामलल्ला परिसरात बनणार सात मंदिर, कधीपर्यंत होणार पूर्ण मंदिर

ram temple consecration | राम मंदिरात आज भगवान श्रीराम विराजमान होणार आहे. तब्बल ५०० वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे. रामलल्लाचे संपूर्ण मंदिर कधी पूर्ण होणार आहे? याबाबत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती दिली.

रामलल्ला परिसरात बनणार सात मंदिर, कधीपर्यंत होणार पूर्ण मंदिर
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 11:55 AM

अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | आयोध्या येथे होणाऱ्या राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. देशातील मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घरघर फुलांनी सजवले गेले आहे. आता सर्वांना रामलल्लाच्या मूर्तीची झलक पाहण्यास आज मिळणार आहे. मंदिराचे संपूर्ण काम कधी पूर्ण होणार आहे? यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती दिली. आता आज प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मंदिराचे काम उद्यापासून 23 जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार आहे.

कधीपर्यंत होणार मंदिर पूर्ण

23 जानेवारीनंतर पुन्हा राम मंदिराचे काम सुरु होणार आहे. या परिसरात सात मंदिर असणार आहेत. मंदिर परिसरात बनणारे सात मंदिर सामाजिक सदभावचे प्रतिक असणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत राम मंदिर निर्माणाचे काम पूर्ण होणार आहे. 2.7 एकर जमिनीवर नागरा शैलीत राम मंदिराची उभारणी केली जात आहे. तीन मजली असणाऱ्या या राम मंदिराची लांबी 380 फूट तर रुंदी 250 फूट आहे. राम मंदिराची उंची 161 फूट आहे. मंदिरात 392 स्तंभ आणि 44 दरवाजे आहे. मंदिरात पांच मंडप आहे. त्यांचे नाव नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप ठेवले आहे.

अरुण योगीराज यांनी बनवली मूर्ती

म्हैसूर येथील प्रसिद्ध मूर्तीकर अरुण योगीराज यांनी रामलल्लाची 51 इंच मूर्ती तयार केली आहे. गुरुवारी या मूर्तीला गर्भगृहात स्थापित करण्यात आले. मूर्तीचे डोळे कपड्याने झाकले गेले आहेत. 35 फूट लांब वरुन मंदिरात दर्शन करता येणार आहे. मंदिरात प्रवेश पूर्व दिशेला तर बाहेर जाण्याचा मार्ग दक्षिण दिशेला आहे.

हे सुद्धा वाचा

अयोध्येत उत्साहच वातावरण

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्साहाच वातावरण दिसून येत आहे. या ठिकाणी राम आणि सीता वेष परिधान करुन बाल कलाकार फिरत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून साधुसंत, महंत, कथावाचक आणि भागवत कथा सांगणारे प्रकांड पंडित पोहोचले आहेत. अयोध्यातील कनक भावन सजवले आहे. या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि सीता दोघेही वनवासात जाण्यापूर्वी राहिल्याच्या अनेक आख्यायिका आहेत.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.