महाराष्ट्रावरही कोरोनाचं संकट, केरळनंतर आता या राज्यांमध्ये आढळला नवा JN.1 व्हेरिएंट
covid 19 Update : देशात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकं सज्ज होत असतानाच कोरोनाचं संकट पुन्हा एकदा येत आहे. कारण केरळ नंतर आता महाराष्ट्र आणि गोव्यातही नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. पर्यटकांना सावधगिरीचा इशारा ही देण्यात आला आहे,
Covid 19 Update : हिवाळा सुरु होताच देशात कोरोनाचं संकट देखील वाढू लागले आहे. कोरोनाचा नवा प्रकार JN.1 चे रुग्ण आता भारतात देखील आढळू लागले आहेत. हा प्रकार अनेक देशांमध्ये झपाट्याने पसरत आहे. 8 डिसेंबर रोजी देशात पहिले प्रकरण नोंदवले गेले होते, परंतु आता त्याची सक्रिय प्रकरणे 2000 च्या जवळ पोहोचली आहेत. या कोरोना प्रकाराबाबत सरकारने सर्व राज्य सरकारांना आधीच अलर्ट केले आहे.
केरळ नंतर आता महाराष्ट्र आणि गोव्यात देखील प्रकरणे आढळून आले आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन आधी ही चिंतेची बाब आहे. बरेच लोक या दरम्यान फिरण्यासाठी जातात. नवीन वर्षाच्या पार्ट्यांसाठी लोक गोव्याकडे जातात. अशा परिस्थितीत कोरोनाचा रुग्ण येथे आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांना सावधगिरीचा इशारा
नवीन वर्षाच्या पार्टीसाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पर्यटकांना मास्क घालण्याच्या, सामाजिक अंतर पाळण्याचे आणि लसीकरण करण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अशा सूचना दिल्या जात आहे.
पर्यटकांना सॅनिटायझर आणि मास्क सोबत बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. वारंवार हात चांगले धुवावेत. पार्टीला जाण्यापूर्वी तब्येतीची तपासणी करावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पर्यटकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असे सरकारने म्हटले आहे.
उत्तराखंडमध्येही अलर्ट
कोरोनाच्या नवीन प्रकारांचा वाढता धोका पाहता उत्तराखंड सरकार सतर्क झाले आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हे आणि रुग्णालयांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. देशभरात वेगाने वाढणारी प्रकरणे समोर आल्यानंतर उत्तराखंड संभाव्य उद्रेकाला तोंड देण्याची तयारी करत आहे.