ओमिक्रॉनची धास्ती, पण डेल्टाच जास्त जीवघेणा! आरोग्य मंत्रालयानं नेमकं काय सांगितलं?

देशात कोरोनामुळे होत असलेले मृत्यू हे डेल्टा व्हेरियंटमुळे होत आहे. धर्मशिला कॅन्सर रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर अंशुमन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा विषाणूचा संसर्ग अद्यापही सुरुच आहे. तसंच लोकांच्या मृत्यूलाही डेल्टा व्हेरियंट कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध राहणं गरजेचं आहे.

ओमिक्रॉनची धास्ती, पण डेल्टाच जास्त जीवघेणा! आरोग्य मंत्रालयानं नेमकं काय सांगितलं?
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 6:08 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचा फैलाव वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष हे ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येवर आहे. तज्ज्ञांच्या मते ओमिक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण तर वाढत आहेतच. मात्र, खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) अधिक धोकादायक ठरत आहे. देशात कोरोनामुळे होत असलेले मृत्यू हे डेल्टा व्हेरियंटमुळे होत आहे. धर्मशिला कॅन्सर रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर अंशुमन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा विषाणूचा संसर्ग अद्यापही सुरुच आहे. तसंच लोकांच्या मृत्यूलाही डेल्टा व्हेरियंट कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध राहणं गरजेचं आहे.

दिल्लीत 29 डिसेंबर रोजी डेल्टा व्हेरियंटचे 685 रुग्ण आढळून आले. तर 30 डिसेंबरला डेल्टाचे 1 हजार 50 रुग्ण आढळले. तर वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला डेल्टाचे 1 हजार 476, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी डेल्टा रुग्णांचा आकडा 2 हजार 365 नोंदवला गेला. 2 जानेवारीला डेल्टाचे 2 हजार 843, 3 जानेवारीला 3 हजार 748 नवे रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यात 28 डिसेंबर रोजी दिल्लीत डेल्टा व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता. तर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीलाही डेल्टा व्हेरियंटची लागण झालेला एक-एक रुग्ण मृत्यू पावला आहे. त्यामुळे ओमिक्रॉनसोबत डेल्टा विषाणू पुन्हा डोके वर काढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नवी दिल्लीत विकेंड कर्फ्यू

नवी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. डीडीएमएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयात 50 टक्के उपस्थितीद्वारे काम सुरु ठेवावं, असं सांगण्यात आलं आहे. तर, एम्सनं कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

मुंबईत लॉकडाऊन लागणार?

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत लॉकडाऊन लावण्याबाबत सूचक इशारा दिला आहे. ओमिक्रॉनला घाबरू नका. मात्र, सारे चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आत्ता सगळे सावरतायत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा. घरातील सर्वांचे लसीकरण करा. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. मास्क न लावता फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय 20 हजारांचा आकडा क्रॉस झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल, असा इशारा त्यांनी लॉकडाऊनबाबत दिला.

इतर बातम्या :

Pune Corona Update : मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील 1ली ते 9वी पर्यंतचा शाळा उद्यापासून बंद, नवी नियमावली काय?

रश्मी ठाकरे उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, शिवसेना नेत्याच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.