कोरोनाने कमी केले मानवाचे आयुष्य, सरासरी वयात किती झाली घट वाचा…

Corona effet Life Expectancy Dropped | नवीन संशोधनामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना इतर आजार होत असल्याचे अभ्यासातूनही समोर आले आहे. कोरोना झालेले काही लोक अनेक आजारांनी त्रस्त होत आहे. यावरून करोनाचे विध्वंसक परिणाम दिसून येत आहेत, असे संशोधकांनी अहवालात नमूद केले आहे.

कोरोनाने कमी केले मानवाचे आयुष्य, सरासरी वयात किती झाली घट वाचा...
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 4:23 PM

नवी दिल्ली | 13 मार्च 2024 : कोरोनाचा धोका संपलेला आहे. परंतु कोरोनाचे दुष्यपरिणाम संपले नाही. कोरोना झालेल्यापैकी काही जणांवर अजून त्यांचे परिणाम जाणवत आहे. एकंदरीत सर्व मानव जातीसाठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय विज्ञानामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कोरोनाने कमी केले आहे. कोरोनानंतर मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 वर्षांनी कमी झाले आहे. ‘द लॅन्सेट जर्नल’ने केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. “ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, जहांपनाह, लंबी नहीं”, हे आनंद चित्रपटातील संवाद यामुळे पुन्हा चर्चेला जात आहेत.

रिपोर्टमध्ये आहे काय

नवीन वैद्यकीय सुविधांमुळे मानवाचे आयुष्य वाढत होते. 1950 मध्ये मानवाचे सरासरी वय 49 वर्षे होते, ते 2019 मध्ये 73 वर्षांपेक्षा जास्त झाले. परंतु 2019 मध्ये कोरोना आला. त्यानंतर ही प्रक्रिया उलटी झाली. 2019 ते 2021 दरम्यान मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 ने घटले आहे. कोरोनोचा हा सर्वात गंभीर दुष्परिणाम समोर आला आहे. जगातील 84 टक्के देशांमधील आयुर्मान घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

पुरुषांचा मृत्यूदर 22% वाढला

कोरोना दरम्यान 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांचा मृत्यूदर 22 टक्के वाढला आहे. महिलांमध्ये हे प्रमाण 17 वाढले आहे. 2020 आणि 2021 दरम्यान जगात 13.1 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यात 1.6 कोटी मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे COVID-19 बालकांचा मृत्यूदर कमी झाला. 2019 तुलनेत 2021 मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा मृत्यूदर कमी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

कोरोनातून बरे झालेल्यांना आजार

नवीन संशोधनामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना इतर आजार होत असल्याचे अभ्यासातूनही समोर आले आहे. कोरोना झालेले काही लोक अनेक आजारांनी त्रस्त होत आहे. यावरून करोनाचे विध्वंसक परिणाम दिसून येत आहेत, असे संशोधकांनी अहवालात नमूद केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कान आणि डोळ्यांच्या क्षमतेवर थेट हल्ला करत आहे, अशा तक्रारी समोर येत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.