Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update | कोरोना रुग्णांचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं, 80 टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

देशात कोरोना वाढण्याचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं आहे ( Corona growth rate down). देशभरात आतापर्यंत 13.6 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Corona Update | कोरोना रुग्णांचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं, 80 टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 5:31 PM

नवी दिल्ली : देशात कोरोना वाढण्याचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं आहे ( Corona growth rate down). देशभरात आतापर्यंत 13.6 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ते ठणठणीत बरे झाले आहेत. तर 80 टक्के कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरं होण्याचा मार्गावर आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली (Corona growth rate down).

“देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 13,387 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 437 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 23 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 1,007 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, “कोरोनामुळे होणारा एकही मृत्यू चिंतेचा विषय आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा पराभव करायचा आहे. त्यामुळे वेगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. देशभरात अँटी बॉडीजवर काम केलं जात आहे. प्लाझ्माच्या माध्यमातून उपचार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

प्लाझ्मा म्हणजे काय ?

प्लाझ्मा हा एक पिवळसर रंगाचा द्रव्य घटक आहे. हा आपल्या रक्तातील पेशींना संपू्र्ण शरीरात प्रवाहित करण्याचं काम करतो. तो रक्ताच्या 55 टक्के असतो. प्लाझ्मा हा रुग्णांना योग्य प्रमाणात दिल्याने शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ही अँटीबॉडीज फक्त संसर्ग झालेल्या लोकांपासूनच तयार केल्या जाऊ शकतात.

कोविड-19 पासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, ज्या या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याला कॉन्व्हुलसंट प्लाझ्मा थेरपी (Convulsant Plasma Therapy) असं म्हणतात. या थेरेपीचा वापर पहिल्यांदा 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू महामारीवेळी करण्यात आला होता.

1514 जणांची कोरोनावर मात

दरम्यान, देशभरात आतापर्यंत 1514 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जगभरात आतापर्यंत 21 लाखापेक्षाही जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1 लाख 47 हजार लोकांचा यात मृत्य झाला. तर 5 लाख 50 हजार जणांनी यावर यशस्वी मात केली आहे.

संबंधित बातम्या :

प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल : मुख्यमंत्री

पुण्यात ‘लॉकडाऊन जोडप्यां’मध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढला, नवरोबांना ‘क्वारंटाईन’चा इशारा

सडपातळ महिलांना फटीतून ‘एक्साईज’च्या गोदामात पाठवलं, वर्ध्यात दारुच्या 202 पेट्या चोरीला

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.