ओमिक्रॉनची दहशत जास्त धोका कमी, नवा वेरिएंट आफ्रिकेत 2 महिन्यांपासून, नेमकं काय घडतंय?

ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंट पेक्षा सातपट जास्त संक्रामक सांगितलं जातंय. मात्र, आफ्रिकेत नेमंक काय घडतंय. दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती गंभीर नसल्याचं तिथल्या आरोग्य विषयक संस्थांनी सांगितलं आहे.

ओमिक्रॉनची दहशत जास्त धोका कमी, नवा वेरिएंट आफ्रिकेत 2 महिन्यांपासून, नेमकं काय घडतंय?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 8:56 AM

मुंबई: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत चिंतेचं वातावरण नसल्याच समोर आलं आहे. कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्यानं यूरोपियन यूनियननं तडकाफडकी आफ्रिकेतील विमानं उड्डाण रद्द केली आहेत. ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंट पेक्षा सातपट जास्त संक्रामक सांगितलं जातंय. मात्र, आफ्रिकेत नेमंक काय घडतंय. दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती गंभीर नसल्याचं तिथल्या आरोग्य विषयक संस्थांनी सांगितलं आहे.

ओमिक्रॉन ज्या दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे तिथं गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी होत आहे. यामुळे आफ्रिकन मेडिकल असोसिएशननं ओमिक्रॉन विषाणू त्यांच्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून असून त्यामध्ये 45 वेळा बदल झाल्याचं सांगितलं आहे. ओमिक्रॉन विषाणू आढळला असला तरी तिथं मृत्यूची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. ओमिक्रॉननं संसर्गित होणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत. त्यांची संसर्गाची लक्षण सौम्य असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी सांगितलंय.

यूरोप आणि आफ्रिकेतील तुलनात्मक स्थिती काय?

आफ्रिकेतील 54 देशांमध्ये जगातील 17 टक्के लोकसंख्या आहे. तिथे 4200 रुग्ण दररोज समोर येत आहेत. तर यूरोपमध्ये दरदिवशी 3.63 लाख कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आफ्रिकेत दररोज कोरोनामुळं 150 लोकांचा मृत्यू होतोय. तर, योरपमध्ये दररोज मरणाऱ्यांची संख्या 3880 इतकी आहे.गंभीर बाब म्हणजे यूरोपमध्ये कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूची संख्या दररोज वाढत आहे. यूरोपमध्ये आढळारे रुग्ण डेल्टा वेरिएंटचे आहेत.

महाराष्ट्र कर्नाटकचा आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावली होती. आफ्रिकेतील धोका असणाऱ्या देशातून येणाऱ्या लोकांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरयांनी आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाईल. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जिनोम सिक्वेन्सिंग केलं जाईल. प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईळ. तर, कर्नाटाकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 7 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास तो घराबाहेर पडू शकतो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास विमानतळाजवळचं त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था केली जाईल.

इतर बातम्या:

विमानतळावर उतरलेल्यांना सक्तीचे अलगीकरण, ओमिक्रॉन कोरोनाचा रुग्ण आढळल्यास इमारत सील, मुंबई पालिका सज्ज

Omecron : HIV च्या विषाणुमुळे आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ? वैज्ञानिकांच्या अंदाजाने मोठी खळबळ

Corona Omicron variant what is situation in Africa and comparison to Europe

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.