नवीन वर्षाच्या आधी कोरोनाने वाढवल्या चिंता, 24 तासात इतक्या लोकांचा मृत्यू
Corona cases : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण भारतात वाढू लागले आहेत. जगभरात वेगाने पसरत असलेला व्हेरिएंट भारतात आल्याने आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. कोरोना रुग्णांची मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढल्या आहेत.
Corona Update : देशात नवीन वर्षाच्या सुरुवाती आधी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 702 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4,097 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोविड-19 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या नवीन प्रकारांची प्रकरणे
देशभरात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराची प्रकरणे 110 वर पोहोचली आहेत. गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4, तेलंगणामध्ये 2 आणि दिल्लीत 1 रुग्ण आढळून आला आहे. बहुतांश रुग्ण सध्या घरातच क्वारंटाईनमध्ये आहेत. बुधवारी देशात कोविड-19 चे 529 नवीन रुग्ण आढळले.
आतापर्यंत 5.3 लाखांहून अधिक मृत्यू
22 डिसेंबर रोजी देशात 752 नवे रुग्ण आढळले आहेत. थंडीत आधीच लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते. त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला तोंड द्यावे लागते. 5 डिसेंबरपर्यंत दररोज वाढणारी संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती. 2020 च्या सुरुवातीपासून चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाला आहे आणि त्यामुळे 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटी झाली आहे.