‘बंगाल’ मध्ये कोरोनाचा वेग वाढतोय, भीतिदायक आकडे उघड; गेल्या 24 तासांत 4 जणांचा मृत्यू, सुमारे 3000 संक्रमित!
पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 3000 च्या आसपास असून, गेल्या 24 तासात मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे. हा वेग असाच वाढत राहिल्यास परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Corona) कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे 3000 च्या जवळ पोहोचली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर संसर्गाचा दर १७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. या कालावधीत बंगालमध्ये एकूण 2962 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या हेल्थ बुलेटिननूसार, बंगालमध्ये कोरोना संसर्गामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि पॉझिटिव्ह रेटही जवळपास 15 टक्के होता. पण आज पॉझिटिव्ह रेट (Positive rate) वाढला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनूसार, पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 17.36 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संक्रमित रुग्णांचे प्रमाण वाढल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे. डॉक्टरांनी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे (Corona Protocol) नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे.
संक्रमणात उत्तर – 24 परगणा अव्वल
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, पश्चिम बंगालच्या उत्तर-24 परगणामध्ये गेल्या 24 तासांत 737 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण राज्यात उत्तर 24 परगणा कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट बनला आहे. आदल्या दिवशी, उत्तर 24 परगणामध्ये 743 लोकांना कोरोनाची लागण झाली होती, तर कोलकातामध्ये 742 लोकांना संसर्ग झाला होता. हुगळीत 183, दक्षिण 24 परगणामध्ये 181, नादियामध्ये 125 आणि पूर्व बर्दवानमध्ये 109 जणांना संसर्ग झाला होता, मात्र रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कोलकत्यात 658 लोकांना संसर्ग झाला आहे. हुगळीत 196, पश्चिम बर्दवानमध्ये 152, दक्षिण 24 परगणामध्ये 144 आणि नादियामध्ये 137 जणांना संसर्ग झाला आहे.
लोकांनीच कोरोना प्रोटोकॉल मोडला
राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत, मात्र लोक कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याबाबत बेफिकीर दिसत आहेत. बाजारात लोक मास्क घालत नाहीत किंवा सोशलडिस्टन्सींग पाळले जात नाही. याबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राज्य प्रशासनाकडून लोकांना सतत सतर्क केले जात असून, कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहीमही सुरू केली आहे, कारण पहिला डोस घेतल्यानंतर दूसरा डोस घेण्याबाबत लोक जागरूक नाहीत. संक्रमण वाढत असतानाही लोक दूसरा डोस घेण्यास इच्छुक नसल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.