Delhi Corona : राजधानीत कोरोनाचा धोका वाढला! 24 तासांत 100 नवे कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र, हजाराच्या घरात आढळतायेत रुग्ण

राजधानी दिल्लीतील परिस्थिती पाहता कोरोनाचा धोका अधिक वाढत असल्याचं दिसतंय.

Delhi Corona : राजधानीत कोरोनाचा धोका वाढला! 24 तासांत 100 नवे कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र, हजाराच्या घरात आढळतायेत रुग्ण
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 6:09 PM

दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोनाचा (Corona) कहर वाढतो आहे. दिल्लीत सलग सहा दिवसांपासून रोज एक हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळून येतायेत. बुधवारी दिल्लीमध्ये कोरोनाचे तेराशे पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर या कोरोनाबाधितांपैकी एकाचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती आहे. राजधानीत कोरोनाच्या संक्रमणाता दर 4.50 टक्के इतका आहे. यापूर्वी दिल्लीत मंगळवारी बाराशेपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. दिल्लीमध्ये  दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे दिल्ली सरकार कोरोनाचा हा कहर पाहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर दिल्लीत 24 तासांत 100 नवे कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र (containment zone) निर्माण झाले आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र वाढतायेत

दिल्लीत कोरोनाची परिस्थिती कधीही बिघडू शकते, असे संकेत मिळतायेत. कोरोनाची स्थिती आणि रोज वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता दिल्लीकरांना देखील आता कोरोनाची भीती वाटायला लागली आहे. राजधानीत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढती आहे. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलं जातंय. दिल्लीमध्ये चोवीस तासांत अशा शंभर प्रतिबंधात्मक क्षेत्रांची वाढ झाली आहे. दिल्लीत सध्या 796 कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे. बुधावारी या कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रांची वाढ होऊन याचा आकडा हा 991 वर गेलाय.

दिल्लीतील कोरोना परिस्थिती

  1. कोरोनाबाधितांची संख्या : दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय. 11 एप्रिलला दिल्लीत 601 कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. ती संख्या 27 एप्रिलला वाढून 4 हजार 832 झाली.
  2. रुग्णांची संख्या वाढली : मंगळवारी 114 कोरोनाचे रुग्ण रुग्णालयात वाढतायेत. बुधवारी ही संख्या 129 होती, आता रुग्णालयात 9 हजार 242 सक्रिय रुग्णांची संख्या आहे.
  3. सलग हजारावर रुग्ण : सलग 6 दिवसांपासून हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळतायेत. 27 एप्रिलला 1367 कोरोनाचे रुग्ण आढळले. 26 एप्रिलला 1204 कोरोनाचे रुग्ण आढळे त्यानेतर याच पटीमध्ये 22 एप्रिलपर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत गेले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.