दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोनाचा (Corona) कहर वाढतो आहे. दिल्लीत सलग सहा दिवसांपासून रोज एक हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळून येतायेत. बुधवारी दिल्लीमध्ये कोरोनाचे तेराशे पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर या कोरोनाबाधितांपैकी एकाचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती आहे. राजधानीत कोरोनाच्या संक्रमणाता दर 4.50 टक्के इतका आहे. यापूर्वी दिल्लीत मंगळवारी बाराशेपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. दिल्लीमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे दिल्ली सरकार कोरोनाचा हा कहर पाहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर दिल्लीत 24 तासांत 100 नवे कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र (containment zone) निर्माण झाले आहेत.
दिल्लीत कोरोनाची परिस्थिती कधीही बिघडू शकते, असे संकेत मिळतायेत. कोरोनाची स्थिती आणि रोज वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता दिल्लीकरांना देखील आता कोरोनाची भीती वाटायला लागली आहे. राजधानीत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढती आहे. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलं जातंय. दिल्लीमध्ये चोवीस तासांत अशा शंभर प्रतिबंधात्मक क्षेत्रांची वाढ झाली आहे. दिल्लीत सध्या 796 कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे. बुधावारी या कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रांची वाढ होऊन याचा आकडा हा 991 वर गेलाय.