दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले, केंद्राचे नवे नियम काय?

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतलाय. दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले असल्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आलंय. आता फक्त सोशल डिस्टंसिंग आणि मास्क गरजेचा आहे, असेही स्पष्ट करण्यात आलंय.

दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले, केंद्राचे नवे नियम काय?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 7:38 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतलाय. दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले (Unlock India) असल्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आलंय. आता फक्त सोशल डिस्टंसिंग आणि मास्क (Mask) गरजेचा आहे, असेही स्पष्ट करण्यात आलंय. केंद्र सरकारने निर्बंध संपूर्ण संपुष्टात आणण्याची घोषणा केली, असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मास्क लावण्याचा नियम मात्र कायम असणार आहे. येत्या 31 मार्चपासून देशातील कोरोना निर्बंध (Corona New Rules) संपणार, अशी माहिती देण्यात आलीय. केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्व हठवली जाणार, असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. मास्कमुक्तीबाबत सध्या निर्णय झालेला नाही. त्यामुळं जनतेला मास्क वापरावाचं लागणार आहे. आज ही नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय.

निर्बंध पूर्णपणे सैल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आता कोरोनाची साथ कमी झाल्याने, निर्बंध हटवल्यास आर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील नियंत्रणात आली आहे. आता आवळलेले निर्बंध संपुष्टात आले आहेत. केंद्र सरकारच्या वतीने कोरोना संदर्भात कोणतेही नवीन आदेश लागू करण्यात येणार नाहीत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच भविष्यात पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू नये यासाठी काय करावे हे सांगण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळेवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून राज्यांना सल्ला दिला जाणार आहे.

तीन लाटांनी जगाला हैराण केले

गेल्या जवळपास अडीच वर्षापासून कोरोनाने जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा अनेक लाटा जगाने पाहिल्या आहे. तिसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेदना अत्यंत भयंकर आहेत. कित्येक दिवस लोकांना लॉकाडाऊनमुळे घरात बसून राहवं लागलं आहे. मात्र आता लसीकरणाचे अस्त्र आपल्याकडे असल्यामुळे दिवसेंदिवस दिलासा मिळत चालला आहे. भारतातील निर्बंध हटवले असले तरी काही देशात पुन्हा रुग्ण वाढत असल्यामुळे आपल्यालाही अलर्ट मोडवर राहवं लागणार आहे. काही देशांवर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. चीन आणि युरोपातील काही देशांचा धोका पुन्हा वाढला आहे.

दिल्ली विमानतळावरच लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, तातडीने AIIMSमध्ये दाखल; पाच डॉक्टरांचं पथक तैनात

महाराष्ट्रातील लोकं Petrol भरण्यासाठी थेट गुजरातमध्ये! दर 100च्या आत, पेट्रोलसाठी नंदुरबारमधील वाहनांच्या रांगा

tv9 Special: धूण्या भांड्याचं पाणी ‘रियूज’ करणार, मोदी सरकारकडून प्रोजेक्टचा शुभारंभ, तुमचं पाणी परत तुमच्याकडेच !

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.