AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Corona Update: देशात कोरोनाचा सुपर स्पीड, 17 ​​हजारांहून अधिक नवीन रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांच्या जवळ

मुंबई, देशात कोरोनाचा वेग वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 17 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर (new cases) आली आहेत. देशात कोरोनाचा वेग वाढत असताना सक्रिय रुग्णांची (active cases) संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही 90 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाची ताजी आकडेवारी (Corona […]

India Corona Update: देशात कोरोनाचा सुपर स्पीड, 17 ​​हजारांहून अधिक नवीन रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांच्या जवळ
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:15 AM

मुंबई, देशात कोरोनाचा वेग वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 17 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर (new cases) आली आहेत. देशात कोरोनाचा वेग वाढत असताना सक्रिय रुग्णांची (active cases) संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही 90 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाची ताजी आकडेवारी (Corona update) जाहीर केली आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात संक्रमणाचे 17336 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 13 संक्रमित लोकांचा मृत्यू (Corona death) झाला आहे.

देशातील एकूण  कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या 5 लाख 24 हजार 954 वर पोहोचली आहे. कोरोनाला मात देऊन निरोगी झालेल्या लोकांचा आकडा आता 4 कोटी 27 लाख 49 हजार 56 इतका आहे. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गाची सक्रिय प्रकरणे आता 88284 वर पोहोचली आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे कोरोना विषाणूचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. काल  म्हणजेच 24 जून रोजी देशात कोरोना संसर्गाची 13313 नवीन प्रकरणे समोर आली होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाला होता, त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला होता. शासनाकडूनही निर्बंध हटविण्यात आले होते. कोरोना आता परत आपले पाय पसरवीत असल्याने देश निर्बंधाच्या उंबरठयावर उभा आहे. अशातच येणारे दिवस हे सणासुदीचे असल्याने बाजारात मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. ही सगळ्यांसाठीच पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे.

हे सुद्धा वाचा
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.