Corona Update : भारतातील 8 राज्यांनी चिंता वाढवली, महाराष्ट्रासह कोणत्या राज्यांचा समावेश?

8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रोज समोर येणारी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Corona Update : भारतातील 8 राज्यांनी चिंता वाढवली, महाराष्ट्रासह कोणत्या राज्यांचा समावेश?
कोरोना चाचणी करताना डॉक्टर्स
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 5:41 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि दिल्लीसह 8 राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा चिंताजनक बनली आहे. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रोज समोर येणारी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या 8 राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणाचा समावेश आहे. तर केरळमध्ये मात्र कोरोना रुग्णांच्या संख्या काहीशी कमी होताना पाहायला मिळत आहे.(Corona’s condition is critical in 8 states of India including Maharashtra)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल 76.22 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. यात महाराष्ट्रात तब्बल 62 टक्के, केरळमध्ये 8.83 टक्के तर पंबाजमध्ये 5.36 टक्के रुग्ण आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 81.38 टक्के मृत्यू हे 5 राज्यांमध्ये आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 70 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर पंजाबमध्ये 38, केरळमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र, पंजाब आणि केरळमधील प्रभावित जिल्हे

महाराष्ट –

पुणे – 37 हजार 384 नागपूर – 25 हजार 861 मुंबई – 18 हजार 850 ठाणे – 16 हजार 735 नाशिक – 11 हजार 867

केरळ –

एर्नाकुलम – 2 हजार 673 पठानमथिट्टा – 2 हजार 482 कन्नूर – 2 हजार 263 पलक्कड – 2 हजार 147 त्रिशूर – 2 हजार 65

पंबाज –

जालंधर – 2 हजार 131 एसएएस नगर – 1 हजार 868 पटियाला – 1 हजार 685 लुधियाना – 1 हजार 643 होशियारपूर – 1 572

..तर लॉकडाऊन शेवटचा पर्याय – उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशावेळी नागरिकांनी सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे. भाजी मंडई किंवा अन्य ठिकाणी होणारी गर्दी टाळली पाहिजे. रुग्णसंख्या वाढतच गेली तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असे स्पष्ट संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर

राज्यात शुक्रवारी दिवसभरात (daily corona update) कोरोनाचे तब्बल 25 हजार 681 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21 लाख 89 हजार 965 इतकी झाली आहे. तर काल राज्यात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण 53 हजार 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात एकूण 14 हजार 400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: विनामास्क फिरताना रोखलं, महिलेकडून क्लीनअप मार्शललाच मारहाण

Maharashtra Covid-19 New Guidelines | राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना

Corona’s condition is critical in 8 states of India including Maharashtra

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.