Corona Update | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 12,899 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 15 जणांचा मृत्यू!
मुंबईत शनिवारी 2,054 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. आतापर्यंत 10,59,362 लोकांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1743 आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 14,345 नमुने तपासण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा सकारात्मक असून 97 टक्के आहे.
दिल्ली : देशामध्ये सातत्याने कोरोना (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशामध्ये 12,899 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. तर तब्बल 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. सक्रिय रुग्णांची (Patient) संख्या 72,474 वर पोहोचली आहे. भारतामधील येणारी आकडेवारी धडकी भरवणारीच आहे. कारण देशामध्ये कोरोनाने परत एकदा पाय पसरवण्यास सुरूवात केलीये. कोरोनाची रूग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आवश्यक आहे. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Infection) पुन्हा वाढल्याने साहजिकच त्याचा परिणाम हा देशातील कोरोना रुग्णवाढीवर होतो आहे.
#CoronavirusUpdates १८ जून, संध्या. ६:०० वाजता
हे सुद्धा वाचा२४ तासात बाधित रुग्णौ- २०५४
२४ तासात बरे झालेले रुग्ण-१७४३
बरे झालेले एकूण – १०५९३६२ बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण- १३६१३
दुप्पटीचा दर- ३८९ दिवस कोविड वाढीचा दर (११ जून- १७ जून)-०.१७४%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 18, 2022
मुंबईत शनिवारी 2,054 नवीन कोरोना रूग्णांची नोंद
मुंबईत शनिवारी 2,054 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. आतापर्यंत 10,59,362 लोकांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1743 आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 14,345 नमुने तपासण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा सकारात्मक असून 97 टक्के आहे. आता मुंबईमध्ये एकूण सक्रिय रुग्णसंख्या ही 13613 असून यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 36 नवीन आढळून आल्याने संसर्ग झालेल्यांची संख्या 4,76,370 झाली आहे. दिवसभरात 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मास्क वापरणे महत्वाचेच
काल राज्यामध्ये 3,883 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी दोनच गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. 1 म्हणजे मास्क आणि दुसरे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे महत्वाचे आहे. सध्या देशामध्ये सापडलेल्या काही रूग्णांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.