Corona Cases in India | कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 वर गेला आहे (Corona Update India cases)

Corona Cases in India | कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट
Corona Virus
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 10:04 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत काहीशी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडाही साडेतीन लाखांपेक्षा जास्त आहे. (Corona Update India reports new 353818 COVID19 cases in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 66 हजार 161 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 53 हजार 818 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

आतापर्यंत देशात 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 46 हजार 116 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 45 हजार 237 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 1 लाख 76 हजार 603 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 3,66,161

देशात 24 तासात मृत्यू – 3,754

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,53,818

एकूण रुग्ण – 2,26,62,575

एकूण मृत्यू – 2,46,116

एकूण डिस्चार्ज – 1,86,71,222

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 37,45,237

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 17,01,76,603

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती Corona Update India cases

संबंधित बातम्या :

कोरोनाची औषधं आणि लसीवर जीएसटी कर गरजेचा, अन्यथा किंमत वाढेल: निर्मला सीतारामन

कोरोनाचे नवे प्रकार आणि लाटांपासून वाचण्याचे 2 उपाय, वाचा तज्ज्ञ काय सांगतात?

(Corona Update India reports new 353818 COVID19 cases in the last 24 hours)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.