आनंदाची बातमी! पुढच्या आठवड्यात कोरोना लशीची पहिली खेप भारतात येणार

देशातील नागरिकांचे लक्ष कोरोनावरील लस कधी येणार याकडे लागले आहे. अशात नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आनंदाची बातमी! पुढच्या आठवड्यात कोरोना लशीची पहिली खेप भारतात येणार
अमेरिकन डिक्शनरी मेरियम-वेबस्टर (Merriam-Webstar) ने 'व्हॅक्सिन' (Vaccine) ला 'वर्ड ऑफ द इयर' 2021 म्हणून घोषित केले आहे. व्हॅक्सिन म्हणजे काय हे लहानपणापासूनच आपल्या सर्वांना माहीत आहे, पण गेल्या दोन वर्षांत जगाभरात हा शब्द जास्तीत जास्त वेळा वापरला गेला आहे.
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 3:43 PM

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची (Corona Patients) संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही देशांमधील नियंत्रणात आलेली कोरोनाची (Corona Pandemic) परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांचे लक्ष कोरोनावरील लस (Corona Vaccine) कधी येणार याकडे लागले आहे. अशात नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (Good news about Corona Vaccine)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात (पुढील आठवड्यात) कोरोनावरील लसीची पहिली खेप राजधानी दिल्लीत दाखल होणार आहे. दरम्यान, ही लस कोणत्या कंपनीची असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याविषयी सरकार किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Corona Vaccine first shipment will reach at delhi in last week of december 2020)

दिल्लीतल्या राजीव गांधी रुग्णालयात कोरोनावरील लस ठेवण्याची तयारी सुरु आहे. लसीचा साठा करता यावा यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना व्हॅक्सिन केंद्रासाठी दिल्लीत दोन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचाही समावेश आहे.

कोल्ड स्टोरेजद्वारे दिल्लीत 600 ठिकाणी कोरोना लस देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. राजीव गांधी रुग्णालयाच्या तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर डिप फ्रिझर, कुलर, कोल्ड स्टोरेज बॉक्स आणि लसीचा साठा करुन ठेवण्यासंबंधीची इतर सामग्री ठेवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपूर्वीच ही तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ लसीची पहिली खेप कधी येणार याकडे लक्ष लागले आहे.

कोल्ड स्टोरेजमध्ये वेगवेगळ्या लसींसाठी -40 अंश, -20 अंश आणि 2 ते 8 अंश तापमानाचे फ्रिझर बसवण्यात आले आहेत. आपत्कालीन काळात कोरोनावरील लसीच्या वितरणासाठी परवानगी मिळावी यासाठी आतापर्यंत फायझर इंडिया, सीरम इन्स्टिट्यूट, ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन कोविशिल्ड आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बी. एल. शेरवाल म्हणाले की, लसीकरणाच्या वेळी खबरदारी म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व इतर संबंधित लोक उपस्थित असतील. लसीच्या वितरणासाठी चोख सुरक्षाव्यवस्था असायला हवी. त्यासंबधीची कामं सुरु आहेत. जेणेकरुन लस योग्य हातांमध्ये पोहोचेल आणि ठरलेल्या प्राधान्यक्रमानुसार योग्य व्यक्तींना ती लस दिली जाईल.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Minister of Health Harsh Vardhan) यांनी रविवारी कोरोनावरील लसीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात देशातील नागरिकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले होते. त्यातच आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी कोरोनावरील लसीच्या वितरणाबाबतची महत्त्वाची माहिती दिली. देशात सुरुवातीला 30 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. या 30 कोटी नागरिकांपैकी सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार याबाबत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे.

हर्षवर्धन यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सुरुवातीला एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील प्रभावी लस दिली जाईल. त्यानंतर दोन कोटी frontline workers ना कोरोनावरील लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 26 कोटी नागरिक आणि 50 वर्षांखालील एक कोटी नागरिक ज्यांना काही आजार आहेत, अशा एकूण 30 कोटी नागरिकांना पहिल्या टप्प्यात कोरोनावरील लस दिली जाईल.

संबंधित बातम्या

UK New Coronavirus Strain | चिंता वाढली! लंडनहून दिल्लीला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

जाणून घ्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू का झालाय आऊट ऑफ कंट्रोल?

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, सरकार सतर्क, घाबरु नका

(Corona Vaccine first shipment will reach at delhi in last week of december 2020)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.