Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, देशात 2 लाख 71 हजार नवे रुग्ण, 314 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 71 हजार 202 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, देशात 2 लाख 71 हजार नवे रुग्ण, 314 जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 9:33 PM

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 71 हजार 202 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 7 हजार 743 वर पोहोचली आहे. देशात 15 लाख 50 हजार 377 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 1 लाख 38 हजार 331 जण कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 16.28 वर गेला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 42 हजार 462 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 125 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 लाख 38 हजार 331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 50 लाख 85 हजार 721 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 2 लाख 72 हजार 202 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 314 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 86 हजार 66 वर पोहोचलाय.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 7 हजारांच्या पार

देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 7 हजार 743 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल 125 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालीय.

इतर बातम्या

निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत, आहार संघटनेचं उद्धव टाकरे आणि अजित पवार यांना पत्र

Amravati | Ravi Rana यांनी अमरावतीत विनापरवानगी बसवलेला शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला

Corona virus india 271202 new cases and 314 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses seven thousand

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.