CoronaVirus: मोदी सरकारच्या नाराजीनंतर WHO चा मोठा निर्णय, भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटचे नामांतर
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील सोशल मीडिया कंपन्यांना आपापल्या व्यासपीठावरून इंडियन व्हेरिएंट हा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश दिले होते. | Corona Virus variant
नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या B.1.617.2 या कोरोना विषाणूला (Coronavirus variant) नवे नाव दिले आहे. त्यामुळे आता हा विषाणू डेल्टा (Delta) या नावाने ओळखला जाईल. तर डिसेंबर 2020 मध्ये ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी.1.1.7 या घातक विषाणूला अल्फा (Alpha) म्हणून संबोधण्यात येईल. तर दक्षिण आफ्रिकेतील बी.1.351 हा विषाणू बीटा आणि नोव्हेंबर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेतच सापडलेल्या P.1 व्हेरिएंटसाठी आता गामा हे नाव निश्चित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील सोशल मीडिया कंपन्यांना आपापल्या व्यासपीठावरून इंडियन व्हेरिएंट हा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश दिले होते. (CoronaVirus B.1.617.2 variant new name delta given by WHO)
व्हिएतनाममध्ये सापडला कोरोनाचा नवा धोकादायक व्हेरिएंट
व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक उपप्रकार (व्हेरिएंट) सापडल्याचे समोर आले आहे. व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हेरिएंट भारत आणि इंग्लंडमध्ये आढणाऱ्या विषाणूपासून तयार झाला आहे. या कोरोना व्हेरिएंटच्या हवेतून प्रसाराचा वेग एरवीपेक्षा जास्त आहे.
व्हिएतनामधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा विषाणू भारत आणि इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या संगमातून तयार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण सात व्हेरिएंट आढळून आले आहेत. यामध्ये भारत व इंग्लंडमधील B.1.617.2 आणि B.1.1.7 व्हेरिएंटसचाही समावेश आहे.
भारताचा उल्लेख असलेला ‘तो’ मजकूर हटवा
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना कोरोनाच्या (Coronavirus) B.1.617 या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करू नये, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. तसेच अशाप्रकारचा उल्लेख असलेला मजकूर संबंधित व्यासपीठावरून तात्काळ हटवण्याचे निर्देश केंद्राने दिले होते.
11 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी याचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट, असा करायला सुरुवात केली होती. मात्र, हा दावा सपशेल पोकळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या निवेदनात B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, चुकीच्या माहितीमुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.
संबंधित बातम्या:
मोदी सरकारचा नवा प्लॅन; आता दिवसाला 1 कोटी नागरिकांना लस देणार
Coronavirus: कोव्हॅक्सिन घेणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास मज्जाव?
(CoronaVirus B.1.617.2 variant new name delta given by WHO)