कुणाच्या हातात चप्पल तर कुणाच्या हातात बूट, एकमेकांच्या चारित्र्यावर भ्रष्टाचाराचे शिंतोडे, दिल्लीच्या महापालिकेत राडा
पूर्व दिल्ली महापालिकेच्या सभागृहात आज (28 डिसेंबर) भाजप आणि आम आदमी (आप) पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला (Councilors uproar in East Delhi municipal corporation meeting)
नवी दिल्ली : पूर्व दिल्ली महापालिकेच्या सभागृहात आज (28 डिसेंबर) भाजप आणि आम आदमी (आप) पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही पक्षांचे नगरसेवक समोरासमोर भिडले. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. काही नगरसेवकांनी निदर्शने दिली. तर अनेकांनी प्रचंड आरडोओरड केला. या गदारोळाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आपच्या नगरसेविका मोहिनी जीनवाल यांच्या हातात चप्पल तर भाजप नगरसेवकाच्या हातात बूट दिसतोय. या घटनेप्रकरणी महापौरांनी विरोधी पक्षनेते मनोज त्यागी आणि आपच्या नगरसेविका मोहिनी जीनवाल यांना 15 दिवसांसाठी निलंबित केलं आहे (Councilors uproar in East Delhi municipal corporation meeting).
#WATCH Uproar by Aam Aadmi Party and Bharatiya Janata Party councillors over misappropriation of funds and Centre’s farm laws, at the office of East Delhi Municipal Corporation, in Delhi today pic.twitter.com/egpKhakUxD
— ANI (@ANI) December 28, 2020
मनोज त्यागी आणि मोहिनी जीनवाल यांच्यावर सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. उत्तर महापालिकेत कथित 2500 कोटींच्या घोटाळ्यावरुन आपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी यावेळी आपच्या नगरसेवकांनी केली.
दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी दिल्ली सरकार महापालिका कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे देत नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. हा गोंधळ इतका वाढला की गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली. दोन्ही पक्षाचे नगरसेवक समोरासमोर आले.
याआधी रविवारी (28 डिसेंबर) आपच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या महापालिकांच्या तीनही महापौरांच्या निवासस्थानाला घेराव घालून आंदोलन केले होते (Councilors uproar in East Delhi municipal corporation meeting).