देशातलं नंबर 1 न्यूज नेटवर्क tv9 एनबीडीएतून (NBDA) बाहेर, न्यूज रेटींग्जमधल्या वेळ काढूपणाला विरोध

मी एनबीडीएच्या कारणांसोबत उभा रहाण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय पण त्याचा उपयोग नाही, विरोधाभास म्हणजे न्यूजच्या सर्वात संवेदनशिल मुद्यावर एनबीडीए पब्लिकमध्ये मतं मांडत आहे, ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे.

देशातलं नंबर 1 न्यूज नेटवर्क tv9 एनबीडीएतून (NBDA) बाहेर, न्यूज रेटींग्जमधल्या वेळ काढूपणाला विरोध
tv9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांनी एनबीडीएला पत्र लिहिलं आहे.
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 8:56 PM

देशातलं नंबर 1 न्यूज नेटवर्क असलेलं tv9 अखेर NDBA (News Broadcasters and Digital Association) मधून बाहेर पडलेलं आहे. केंद्र सरकारनं जवळपास वर्षभराच्या नंतर न्यूज रेटींग्ज प्रसारीत करण्यासाठी बार्कला (BARC)ला मंजुरी दिलेली आहे. पण एनबीडीएनं त्यात खोडा घालत, पारदर्शकतेच्या नावाखाली न्यूज रेटींग्ज तातडीनं जारी करण्यास विरोध केलाय. एनबीडीएची ही भूमिका न्यूज नेटवर्कचा महसूल तसंच विश्वासार्हतेचं नुकसान करणारी असल्याचं tv9 नेटवर्कनं म्हटलय. नेटवर्कचे सीईओ बरुण दास (Barun Das) यांनी तशी प्रेस रिलिजही जारी केलीय.

काय आहे प्रकरण?

किती प्रेक्षकांनी, कोणता कार्यक्रम, किती वेळ, कोणत्या वेळेला पाहिला याची माहिती देणे म्हणजे टीआरपी. हे काम सध्या बार्क ही संस्था करते. ही संस्था उद्योगपती तसच जाहिरातदारांची मिळून बनलेली आहे. त्याच टीआरपीच्या आधारावर एखाद्या चॅनलला जाहिराती मिळत असतात. गेल्या वर्षी टीआरपीचा घोटाळा उघड झाला आणि सप्टेंबर 2021 पासून न्यूजचा टीआरपी बंद झाला. तो सुरु करण्यात यावा अशी मागणी विविध न्यूज नेटवर्कने केली. त्यासाठी केंद्रीय प्रसार मंत्र्यांची भेट घेऊन रितसर निवेदनही दिलं गेलं. त्यानंतर नव्या वर्षात प्रसारण मंत्रालयानं न्यूजची रेटींग्ज जारी करण्याचे आदेश दिले. पण त्यात काही बदलही केले. ह्या बदलाचं एनबीडीएने स्वागतही केले पण जोपर्यंत पूर्ण पारदर्शकता येत नाही तोपर्यंत रेटींग्ज जारी करायला विरोध केला. तशी प्रेस रिलिज काल एनबीडीएनं काढलेली आहे. एनबीडीएत 81 न्यूज नेटवर्क आहेत.

सीईओ बरुण दास यांनी एनबीडीएला लिहिलेलं हेच ते पत्रं

काय म्हणाले सीईओ बरुण दास?

जवळपास वर्षभरापासून टीव्ही न्यूजचे रेटींग्ज बंद आहेत. त्याचा परिणाम महसूल आणि न्यूज चॅनल्सच्या विश्वासार्हतेवर झालेला आहे. त्यामुळेच टीआरपी तातडीनं रिलिज करण्यात यावा, अशी टीव्ही 9 नेटवर्कची भूमिका आहे. नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांनी एनबीडीएला एक पत्र लिहिलेलं आहे, त्यात ते म्हणतात- आम्ही एनबीडीएचे पूर्णवेळ सदस्य आहोत. पण एनबीडीएचा जो सध्याचा दृष्टीकोन आहे त्याच्याशी सहमत नाही. अशी भूमिका काही सदस्यांचीच असल्याचं दिसतं आहे. एनबीडीएच्या सर्व सदस्यांची नाही’. पुढे बरुण दास म्हणतात, आम्ही एनबीडीएचे सदस्य म्हणून त्यांच्या कारणांशी मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फार उपयोग दिसत नाही. मला तर याचीही खात्री वाटत नाहीय की, एनबीडीएला रेटींग्ज हवीय की नाही? एनबीडीएनं जी काल भूमिका जाहीर केलीय, ती न्यूज इंडस्ट्रीला आणखी खोलात ढकलणारी आहे. एनबीडीएतून तातडीनं बाहेर पडण्याच्या भूमिकेवर दास म्हणाले- मी एनबीडीएच्या कारणांसोबत उभा रहाण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय. पण त्याचा उपयोग नाही, विरोधाभास म्हणजे न्यूजच्या सर्वात संवेदनशील मुद्यावर एनबीडीए पब्लिकमध्ये मतं मांडत आहे, ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. त्यामुळे एनबीडीएतून तातडीनं बाहेर पडण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नाही.

हे सुद्धा वाचा :

Indian Idol 12 | जितकं गॉसिप होईल, तितकाच टीआरपी वाढेल! कुमार सानूने उडवली ‘इंडियन आयडॉल 12’ची खिल्ली

TRP Scam : BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताला अटक, 2016 पासून टीआरपी घोटाळा सुरु असल्याचा आरोप

TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.