“या ठिकाणी भगवान कल्की घेणार अवतार…”, काशी-मथुरा वादा दरम्यान या जामा मशीदवर असा दावा

Sambhal Jama Masjid Case: 1879 एएसआयची सर्व्हे रिपोर्ट चर्चेत आहे. या रिपोर्टमध्ये या ठिकाणी हिंदू मंदिर होते. ते तोडून मशीद बांधल्याचा उल्लेख आहे. त्या रिपोर्टमध्ये जामा मशिदीचे संपूर्ण सर्वेक्षण दिले गेले आहे. हा रिपोर्ट एएसआयचे तत्कालीन अधिकारी एसईएल कारले यांनी केला आहे.

या ठिकाणी भगवान कल्की घेणार अवतार..., काशी-मथुरा वादा दरम्यान या जामा मशीदवर असा दावा
Sambhal Jama Masjid Case
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 3:28 PM

Sambhal Jama Masjid Case: काशी-मथुरा येथील मंदिर-मशीदीचे प्रकरण न्यायालयात आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील एका न्यायालयाने जामा मशीदचे सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्याठिकाणी प्रशासन हायअलर्टवर होते. मशिदीच्या सर्व्हेनंतर वकील विष्णू शंकर जैन यांनी या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा केला. त्या ठिकाणी असलेले मंदिर तोडून मशीदची निर्मिती करण्यात आली. संभल मंदिर आमची आस्था आहे. आमच्या धार्मिक मान्यतानुसार, भगवान विष्णू यांच्या दशावतारापैकी कल्की अवतार या ठिकाणी होणार आहे.

काय आहे मुस्लीम पक्षाचा दावा

विष्णू शंकर जैन यांनी म्हटले की, 1529 मध्ये बाबरने हे मंदिर तोडले. त्या ठिकाणी मशीद बनवली. हा भारतीय पुरातत्व विभागाचा प्रतिबंधित भाग आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ शकत नाही. संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार जिया उर रहमान म्हणतात, संभलमधील जामा मशीद ऐतिहासिक आणि खूप जुनी आहे. 1991 मध्ये सुप्रीम कोर्टने एक आदेश दिले होते. त्या आदेशानुसार 1947 मध्ये असणारी परिस्थिती तशीच ठेवण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही जण या भागातील सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी मशीद होती. मशीद आहे आणि मशीदच राहणार असल्याचे रहमान यांनी सांगितले.

बाबरनामामध्ये असा उल्लेख

इंग्रजांच्या काळापासून जामा मशीद म्हणजे हिंदूंचे मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. या मशिदीत लावण्यात आलेले खांब हिंदू मंदिराप्रमाणे आहे. त्यावर प्लॅस्टर लावून ते लपवण्यात आले आहे. संभलच्या जामा मशिदीचा उल्लेख बाबरनामामध्ये आहे. त्याबाबत वकील विष्णू शंकर जैन म्हणतात, बाबरनामामध्ये केलेल्या उल्लेखानुसार, बाबरचा दरबारी मीर बेग याने या ठिकाणी असलेल्या मंदिराचे परिवर्तन मशिदीत केले. पुस्तकाच्या 687 क्रमांकाच्या पानावर हा उल्लेख आहे. बाबर याच्या आदेशानंतर या ठिकाणी मशीद करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

एएसआयची सर्व्हे रिपोर्ट चर्चेत

1879 एएसआयची सर्व्हे रिपोर्ट चर्चेत आहे. या रिपोर्टमध्ये या ठिकाणी हिंदू मंदिर होते. ते तोडून मशीद बांधल्याचा उल्लेख आहे. त्या रिपोर्टमध्ये जामा मशिदीचे संपूर्ण सर्वेक्षण दिले गेले आहे. हा रिपोर्ट एएसआयचे तत्कालीन अधिकारी एसईएल कारले यांनी केला आहे. ‘टूर्स न द सेंट्रल दोआब ऐंड गोरखपूर-1874-1875’ शीर्षक असलेल्या या अहवालात मशिदीतील आतील आणि बाहेरील खांब हिंदू मंदिराचे असल्याचे म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.