Covid Vaccine: WHO नंतर 96 देशांकडून Covaxin ला मान्यता – मनसुख मांडविया
WHO ने आतापर्यंत EUL (इमर्जन्सी यूज लिस्ट) मध्ये 8 लसींचा समावेश केला आहे. यापैकी 2 भारतीय लसी - कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्डचा (Covishield) समावेश आहे. दोन्ही भारतीय लसींना 96 देशांनी मान्यता दिली आहे याचा आम्हाला आनंद होत आहे," असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले.
भारत बायोटेकच्या कोरोना लस कोवॅक्सीनला (Covaxin) WHO ने आपत्कालीन वापराच्या यादीत (EUL) समावेश केल्यानंतर आता जगातील 96 देशांनी मान्यता दिली आहे. “WHO ने आतापर्यंत EUL (इमर्जन्सी यूज लिस्ट) मध्ये 8 लसींचा समावेश केला आहे. यापैकी 2 भारतीय लसी – कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्डचा (Covishield) समावेश आहे. दोन्ही भारतीय लसींना 96 देशांनी मान्यता दिली आहे याचा आम्हाला आनंद होत आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले. (Covaxin and Covishield both vaccines get approval from 96 countries after WHO approval)
ते म्हणाले, “आतापर्यंत देशात 109 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. ‘हर घर दस्तक’ अंतर्गत जीथे कमी लसीकरण झालं आहे, तीथे लसीकरण मोहीम राबवण्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देत आहेत. 96 देशांनी Covaxin आणि Covishield ला मान्यता दिली आहे. तुम्ही CoWIN अॅपद्वारे यादी तपासू शकता.”
WHO has included 8 vaccines in EUL (emergency use listing) so far. We are happy 2 out of these are Indian vaccines – Covaxin and Covishield. 96 countries of the world have recognised both these vaccines, following this: Union Health Minister Mansukh Mandaviya #COVID19 pic.twitter.com/MJVpKLCVrm
— ANI (@ANI) November 9, 2021
मागच्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागार टीमने (TAG) Covaxin ला आपत्कालीन वापराच्या यादीत (EUL) समाविष्ट केले होते. WHO ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी Covaxin च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. WHO ची मंजुरी मिळाल्यानंतर आता ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे ते कोणत्याही निर्बंधाशिवाय परदेशात जाऊ शकतील.
WHO ने आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींना मान्यता दिलेल्या यादी लध्ये Covaxin, AstraZeneca Covishield, Pfizer/BioNtech, Johnson & Johnson, Moderna, Sinopharm आणि Sinova या लसींचा समावेश आहे.
Covid Vaccine: 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin च्या मंजुरीसाठी DCGI कडून वेळ लागण्याची शक्यता#Covaxin #COVID19Vic #Vaccine #Bharatbiotech #covaxinforkids https://t.co/HJ7PIxrEoR
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021
Other News