Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid 19: चीनसह अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक,भारतात काय आहे परिस्थिती?

जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आहे. चीनमध्ये परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाताना दिसत आहे. भारतात देखील खबरदारी घेतली जात आहे,

Covid 19: चीनसह अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक,भारतात काय आहे परिस्थिती?
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 10:22 PM

मुंबई : जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोविड-19 प्रकरणांमध्ये नव्याने वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी बुधवारी सकाळी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने चिंता वाढल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा कहर सुरु केला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे.

भारतात परिस्थिती काय?

अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी माहिती दिली की, चीनमधील परिस्थितीबाबत भारताला काळजी करण्याची गरज नाही. चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. पण भारताबाबत बोलायचे झाले तर येथे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

भारत आणि चीनच्या परिस्थितीत खूप फरक आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाचा स्फोट झाला आहे. कारण येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही.चीनने अनेकदा निर्बंध लादले. पण काही वेळाने लोकांचा संयम सुटला आणि चिनी सरकारविरोधात लोकं रस्त्यावर उतरले. त्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आली. पण याचा फटका आता चीनला बसला आहे. चीनमध्ये विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. रूग्णांना रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीयेत. रुग्णांना आवश्यक औषधेही मिळत नाहीयेत.

चीनमध्येन 8० लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. जगातील 10 टक्क्यांहून अधिक लोक पुढील तीन महिन्यांत संसर्गास बळी पडू शकतात.

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.